देशाच्या विकासात काँग्रेसचे योगदान मोलाचे - प्रभाकर मामुलकर
By Admin | Updated: August 7, 2016 00:39 IST2016-08-07T00:39:38+5:302016-08-07T00:39:38+5:30
देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेसचे योगदान मोलाचे असून आज भारत ज्या स्थितीत आहे,...

देशाच्या विकासात काँग्रेसचे योगदान मोलाचे - प्रभाकर मामुलकर
अनेकांची उपस्थिती : नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार
राजुरा : देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेसचे योगदान मोलाचे असून आज भारत ज्या स्थितीत आहे, मग ते तंत्रज्ञान असो की शैक्षणिक उत्कांती असो, या विकासाचे श्रेय काँग्रेसलाच जाते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर मामुलकर यांनी केले.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष यांच्या शनिवारी आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी मुख्य पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे निरीक्षक बाबुराव तिडके, माजी आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, विनोद दत्तात्रय, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, क्रांती नालमवार, सत्यनारायण अग्रवाल, काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा लांडे (राजुरा), विठ्ठलराव थिपे (कोरपना), जिवतीचे गोदरू जुमनाके, गोंडपिपरीचे राजीवसिंह चंदेल, आशिष देरकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, राजुरा शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुनिल देशपांडे, युवक काँग्रेसचे एजाज अहमद, गोलु ठाकरे, बँकेचे संचालक दिलीप नलगे, श्रीधर गोडे, पापय्या पोन्नमवार, सुरेखा चिडे, पंचायत समिती सदस्य भिमय्या अंगलवार, जिल्हा परिषद सदस्य नानाजी आदे उपस्थित होते.
प्रास्ताविक राजुरा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा लांडे यांनी केले. संचालन सचिन फुलझेले यांनी केले. कार्यक्रमात चारही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)