पुन्हा काँग्रेसच सत्तेत येणार
By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:05+5:302015-12-05T09:07:05+5:30
राज्यातील जनतेचा अल्पावधीतच झालेला भ्रमनिरास आणि सर्वसामान्य जनता आणि महिलांची असुरक्षितता, यामुळे जनतेचा युती सरकारवरून विश्वास उडाला आहे.

पुन्हा काँग्रेसच सत्तेत येणार
चारूलता टोकस : महिला मेळाव्यात आशावाद
चंद्रपूर : राज्यातील जनतेचा अल्पावधीतच झालेला भ्रमनिरास आणि सर्वसामान्य जनता आणि महिलांची असुरक्षितता, यामुळे जनतेचा युती सरकारवरून विश्वास उडाला आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा कॉगे्रसच सत्तेत येईल, असा आशावाद प्रदेश महिला काँँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस यांनी व्यक्त केला.
बुधवारी चंद्रपुरात महिला काँग्रेसचा जिल्हा मेळावा पार पडला. त्या प्रसंगी तया बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार होते. प्रदेश उपाध्यक्ष वनमाला राठोड, जिल्हा उपाध्यक्ष आसावरी देवतळे, डॉ. राजनी हजारे, नंदाताई अल्लुरवार, प्रदेश सरचिटणीस शेतकरी सेल जिल्हाध्यक्ष दिनेश चोखारे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष आबिद अली, मलिक शाकिर, मनपाचे स्थाई समिती सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रामु तिवारी, माजी महापौर संगीत अमृतकर आदी प्रमुख पाहुणे होते.
यावेळी बोलाताना टोकस म्हणाल्या, महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी काँगे्रसच्या सत्ताकाळात अनेक योजना राबविल्या गेल्या. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार विजय वडेट्टवार यांचेही मार्गदर्शन झाले. सर्व तालुका अध्यक्षांकडून टोकस यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे यांनी केले. संचालन सुनीता धोटे व सुनीता अग्रवाल यांनी तर, शहर अध्यक्ष अनिता कथडे यांनी आभार मानले. मेळाव्याला जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)