शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

पोटनिवडणुकीत काँग्रेसचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:12 PM

जिल्ह्यात चंद्रपूर महानगरपालिका दोन नगरसेवकपदासाठी, बल्लापूर, चिमूर, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील काही ठिकाणी सरपंच तर काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. कुठे काँग्रेस तर कुठे भाजपने बाजी मारली. काही जागा अपक्षांनीही बळकावल्या. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यानंतर या निवडणुकांकडे जनतेचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकाही तोंडावर असून या निवडणुकीची ही रंगीत तालीमच होती.

ठळक मुद्देकाँग्रेस व भाजप तुल्यबळ पक्ष : अपक्षांनीही मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात चंद्रपूर महानगरपालिका दोन नगरसेवकपदासाठी, बल्लापूर, चिमूर, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील काही ठिकाणी सरपंच तर काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. कुठे काँग्रेस तर कुठे भाजपने बाजी मारली. काही जागा अपक्षांनीही बळकावल्या. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यानंतर या निवडणुकांकडे जनतेचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकाही तोंडावर असून या निवडणुकीची ही रंगीत तालीमच होती.बाबुपेठमध्ये भाजप तर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये काँग्रेस विजयीचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या बाबुपेठ आणि इंडस्ट्रियल इस्टेट वार्डामध्ये झालेल्या पोटनिडणुकीत बाबुपेठमध्ये भाजपचे प्रदीप किरमे तर इंडस्ट्रियल इस्टेट वार्डामध्ये काँग्रेसच्या कलामती यादव यांनी बाजी मारली. किरमे यांना १७०४ तर कलावती यादव यांना २५२२ मते पडली. दोन्ही प्रभागातील एकूण मतदानाची टक्केवारी २८.३९ एवढी आहे. या दोन्ही जात पडताळणीत नगरसेवकपद रद्द झाले होते. बाबूपेठ प्रभागात तब्बल १० वर्षांनी भाजपने बाजी मारली.बाबुपेठ प्रभाग क्र.१३ मध्ये प्रदीप गणपत किरमे यांना १७०४ मते मिळाली. तर संजय आनंदराव बुरडकर (अपक्ष) १५८३, प्रवीण शंकर खनके (अपक्ष) १३७६, भास्कर भाऊराव गहुकर (बसपा) ९४८, राजू शंकरराव कृष्णापूरकर (अपक्ष) यांना ७७५ मते पडली. या प्रभागामध्ये ६ हजार ४६९ मतदारांनी मतदान केले असून ८३ जणांनी नोटाला पसंती दिली.इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ मध्ये काँग्रेसच्या कलामती रामकृष्ण यादव यांना २५२२ मते पडली. तर भाजपाच्या रंजना रवींद्र उमाठे यांना १२६५ मतांवर समाधान मानावे लागले. बसपाच्या सुनीता सुभाष दोनोडे यांना १२६६ मते पडली. या निवडणुकीमध्ये एकूण ५ हजार १११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ५८ मतदारांनी नोटाला पसंती दिली.निवडणूक अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त संजय काकडे, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गव्हाळ यांनी काम बघितले. निकालानंतर विजयी उमेदवारांनी प्रभागामध्ये ढोलताश्याच्या गजरात मिरवणूक काढली.भिसीत काँग्रेस तर अपक्षाची बाजीभिसी : येथील ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी पोटनिवडणू पार पडली. वार्ड क्रमांक १ मधून काँग्रेसचे पंकज रेवतकर यांनी भाजपा समर्थित शुभम गिरडे यांचा १०२ मतांनी पराभव केला. वार्ड क्रमांक तीनमध्ये अपक्ष उमेदवार विजय नन्नावरे यांनी ८० मतांनी काँग्रेस समर्थित उमेदवार जगदीश कुमरे यांचा पराभव केला. अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी १५०० मतदारांसाठी दोन मतदान यंत्रे लावण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत तेवढ्याच मतदारांसाठी एकच मशीन लावल्यात आल्यामुळे मतदान प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरु होती. यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली.गोंडपिंपरीतील दोन सरपंच अविरोधआक्सापूर : गोंडपिपरी तालुक्यात पहिल्या टप्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. यापूर्वी ७ पैकी २ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि २४ ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आले. तालुक्यात पहिल्यांदाच थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने मोठी उत्सुकता होती.तालुक्यात एका नगरपंचायतीसह ५० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यातील मुदत संपणाऱ्या घडोली, नांदगाव, चेकदूबारपेठ, गोजोलीमक्ता, कन्हाळगाव, कुडेसावली आणि परसोडी या या सात ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. यापैकी गोजोली मक्ता व नांदगाव येथील सरपंचपदाचे उमेदवार अनुक्रमे गिरीधर कोटनाके व शैला शालीग्राम अवथरे यांची अविरोध निवड झाली.चेकदुबारपेठ या गावात सरपंचपदासाठी सर्वसाधारण आरक्षण होते. सरपंचासाठी चार उमेदवार रिंगणात होते. यापैकी संतोष कोवे यांनी बाजी मारली. कन्हाळगाव ग्रामपंचायत अंतर्गत सर्वाधिक म्हणजे ६ उमेदवार सरपंच पदाच्या शर्यतीत होते. यात विद्यमान उपसरपंच प्रदीप कुळमेथे यांनी थेट सरपंच होण्याचा मान पटकाविला. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपद राखीव होते. नामाप्रसाठी राखीव असलेल्या परसोडी दोन उमेदवारात लढत झाली. निळकंठ मत्ते यांनी आपला गड राखला. कुडेसावलीत दोन उमेदवार सरपंचासाठी रिंगणात होते. मारोती मडावी यांनी यात बाजी मारली. सरपंचाचे नामाप्र आरक्षण असलेल्या घडोली येथील चार उमेदवारांनी सरपंचासाठी कंबर कसली. हेमराज चौधरी येथून निवडून आले.मरार मेंढा सरपंचपदी दुधराम नैताम तर माहेरमध्ये नितेश राऊत विजयीब्रम्हपुरी : तालुक्यातील मरार मेंढा व माहेर या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तसेच हळदा येथील ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी निवडणूक पार पडली. मरारमेंढा ग्रामपंचायत सरपंचपदी दुधराम नैताम यांनी बाजी मारली. तर माहेर ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून नितेश राऊत विजयी झाले. हळदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये नरेश राऊत यांनी बाजी मारली.मरार मेंढामध्ये सदस्य पदासाठी सुमन जेंगठे, सविता मोहूर्ले, रामभाऊ पिसे, करुणा सोनडवले, गौतम सोनडवले, अमृता गावतुरे विजयी झाले. माहेर ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत नितेश राऊत तर सदस्य पदासाठी समीर सोनडवले, नीता बोरघरे, दौलत कावळे, अरुणा मेश्राम, धनराज आडकीने,अनिता बागडे विजयी झाले. तालुक्यातील दोन ग्रामपंचायतकरिता, सात ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीकरिता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये मेंडकी येथील विनायक पाकमोडे, किशोर सहारे या दोन सदस्यांची व भालेश्वर येथील भीमराव दिघोरे या एका सदस्याची अविरोध निवड करण्यात आली. माहेर येथील एका जागेसाठी नामनिर्देशन दाखल करण्यात आले नाही.घुग्घुसमध्ये सर्वपक्षीय समर्थित उमेदवाराचा विजयघुग्घुस : येथील ग्रामपंचायत वार्ड क्र. ३ च्या अनुसूचित जाती (महिला राखीव) या रिक्त सदस्य पदासाठी झालेल्या पोट निवडणुकीत भाजप काँग्रेस व मित्र पक्ष सर्वपक्षीय घुग्घुस नगर विकास आघाडीच्या उमेदवार लक्ष्मी चिन्ना नलभोगा यांनी काँग्रेस समर्थित शिवसेना उमेदवार रुपाली रामेश्र्वर हिकरे यांचा पराभव केला. घुग्घुस वार्ड क्र ३ मध्ये काँग्रेसच्या विजया माटला या विजयी झाल्या होत्या. मात्र जात प्रमाणपत्र पडताळणी दरम्यान त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. लक्ष्मी चिन्ना नलभोगा यांनी शिवसेना उमेदवार रुपाली हिकरे यांचा ६२४ मतांनी पराभव केला.दहेली येथे पती-पत्नीच्या गळ्यात विजयाची माळबल्लारपूर : विसापूर व गिलबिली येथील एका प्रभागातील पोटनिवडणुकीत काँग्रेस व अपक्ष उमेदवार विजयी झाले. दहेली ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर टेकाम व त्याची पत्नी पुष्पा टेकाम यांनी सदस्य पदाची निवडणूक जिंकली. सरपंच पदाचे उमेदवार योगेश पोतराजे (२७६) यांनी योगेश डाहुले (२३४) यांचा ४२ मताच्या फरकाने पराभव केला. लावारी येथे प्रभाग एक अ मध्ये अतुल पावडे (११७) यांनी सरोज बद्धलवार (११४) यांचा केवळ तीन तर ब जागेवर आरती मावलीकर (१३६) यांनी शोभा गोरघाटे (१२१) यांचा १५ मतांनी पराभव केला. प्रभाग दोन मध्ये अ जागेवर उपसरपंच धीरज निरंजने (८१) यांनी अश्विन निरंजने (७१) यांना १० मतांनी धूळ चारली. ब जागेवर विद्या आत्राम (१२३) यांनीविद्या मडावी (७८) यांचेवर तब्बल ४५ मतांनी मात केली. प्रभाग तीन अ जागेवर सतीश टेकाम (१२१) यांनी मयूर मडचावे (७४) यांच्यावर ४७ मतांनी तर ब जागेवर शारदा कुळमेथे (११५) यांनी छाया तोडे (८७) यांचा २८ मतांनी पराभव केला. दहेली येथील सरपंच पदाच्या उमेदवार सुरेखा खजांजी देरकर (४५४) यांनी कलावती ताराचंद वाढई (३७१) यांच्यावर ८३ मतांच्या आघाडीने पराभव करुन गावाचा कारभार हातात घेतला. येथे प्रभाग एक जागेवर अक्षय देरकर (१७९) यांनी माजी सरपंच कौशल्या काटोल (८७६) यांचा तब्बल १०३ मतांनी पराभव केला. ब जागेवर शोभा पेटकर (१६८) यांनी नंदा गायकवाड (८६) यांना ८२ मतांनी पराभूत केले. दहेली ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोन मधील अ जागेवर विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर टेकाम (१२८) यांची संतोष मडावी (१२८) यांचा केवळ एक मतांच्या फरकाने निसटता पराभव केला. ब जागेवर अश्विनी ठावरी (१४७) यांनी सूवर्णा देरकर (११२) यांचेवर ३५ मतांनी दणदणीत विजय मिळविला. येथील प्रभाग तीन मध्ये अ जागेवर उपसरपंच रमेश मोहीतकर (१७३) यांनी सुधाकर कामतवार (१३७) यांचा ३६ मतांनी, ब जागेवर पुष्पा ज्ञानेश्वर टेकाम (१६१) यांनी शंकुतला तुमराम (१४७) यांचा १४ मतांनी तर क जागेवर सुष्मा उरकुटे (१५६) यांनी जया भोयर (१५५) यांचा केवळ एका मताच्या फरकाने पराभव केला.नागभीडमध्ये पाच ग्रा.पं.वर काँग्रेसचे वर्चस्वनागभीड : तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थित आघाडीेचे सरपंच निवडून आले आहेत. या विजयामुळे काँग्रेस वतुर्ळात उत्साहाचे वातावरण आहे. ४ ग्रामपंचायतीच्या