११० ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व
By Admin | Updated: August 10, 2015 00:41 IST2015-08-10T00:41:18+5:302015-08-10T00:41:18+5:30
जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी या तालुक्यातील जवळपास १६१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री ....

११० ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र : विजय वडेट्टीवार यांच्या गटाने केला दावा
चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी या तालुक्यातील जवळपास १६१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले होते. यात १६१ ग्रामपंचायतीपैकी काँग्रेसने ११० ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद बहुमत मिळविले असल्याचा दावा गटाने केला आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र पूर्वी भाजपाचा बालेकिल्ला होता. त्यामुळे ३५ वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विजय संपादन केले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना सुरूवात होताच, या तिन्ही तालुक्यामध्ये आमदार वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले. त्यात सावली तालुक्यातील ४८ पैकी ३५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यात चारगाव ९ पैकी ६, चांदली ९ पैकी ७, खेडी ९ पैकी ५, चकपिरंजी ९ पैकी ५,व्याहाड खुर्द ११ पैकी ११, व्याहाड बुज. ११ पैकी ७ , सामदा ११ पैकी ८, उपरी ९ पैकी ६, मुंडाळा ९ पैकी ७ काँग्रेस, पाथरी ११ पैकी ८, सायखेडा ९ पैकी ६, केरोडा ९ पैकी ५, अंतरगाव ९ पैकी ६, विहिरगाव ७ पैकी ४, निमगाव ११ पैकी ७, चिचबोडी ९ पैकी ५, चंकबिरखल ९ पैकी ९ काँग्रेस-राकाँ, बोरमाळा ७ पैकी ५, मेहा ७ पैकी ५, पालेबारसा ७ पैकी ५, मंगरमेंढा ७ पैकी ४, चिखली ७ पैकी ४, करोली ७ पैकी ५ काँग्रेस-राकाँ, आकापूर ७ पैकी ५ काँग्रेस-राकाँ, बेलगाव ७ पैकी ४, साखरी ९ पैकी ९, जिबगाव ७ पैकी ७, लोंढोली ९ पैकी ७, हरंबा ९ पैकी ७, निलरानी पेठगाव ९ पैकी ५, वाघोली ७ पैकी ४, कोंडेखल जाम ७ पैकी ५, तर कढोली आणि पारडी या गावात काँग्रेसचे उमेदवार अविरोध निवडून आले आहे.
अंतगाव उसरपार चक, डोंगरगाव, निफंद्रा, घोडेवाही, पेंढरी, हिरापूर, सोनापूर, कापसी या ग्रामपंचायतीमध्ये राकाँ तर कवठी, करगाव, थेरगाव, डोनाळा या चार ग्रामपंचायतीमध्ये भाजपा विजयी झाले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील ५७ पैकी ४६ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने विजयी संपादन केले असून त्यात किन्ही ९ पैकी ५, चकबोथली ७ पैकी ७, बल्लारपूर, सुरबोडी, खरकाडा अविरोध, एकारा ९ पैकी ७, भुज ९ पैकी ९, रामपुरी ९ पैकी ६, जवराबोढा मेढा ९ पैकी ५, गोगाव ९ पैकी ७, सावलगाव ७ पैकी ५, तळोधी खुर्द अविरोध, अहेर नवरगाव १३ पैकी ८ काँग्रेस-राकाँ, रणमोचन ७ पैकी ५ भालेश्वर ७ पैकी ५, मुई ७ पैकी ५ कोसंबी खेड ७ पैकी ५, मुडझा ११ पैकी ७, हळदा ११ पैकी ७, निलज ९ पैकी ५, पाचगाव ७ पैकी ४, बरडकिन्ही ९ पैकी ७, चिचगाव ७ पैकी ५, वायगाव ९ पैकी ९, तुलानमेंढा ९ पैकी ६, बांद्रा ९ पैकी ६, आक्सापूर ७ पैकी ५, रूद्रापूर, मालडोंगरी, चांदगाव, पारडगाव, बेंटाळा, बोंढेगाव, कन्हाळगाव, तोरगाव, तोरगाव खुर्द, बेलगाव जाणी, कालेता, सोदरी, कोथुरणा मक्ता, झिलबोडी, सायगाव या ४६ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस तर खंडाळा, कोलारी, चांदली, चिचोली भुज, हरदोली, जुगनाळा, बोरगाव, चिखलगाव, दिघोरी, रानबोगीली, सोनेगाव आदी ग्रामपंचायतीत काँग्रेसने बाजी मारली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सिंदेवाही तालुक्यातही आघाडी
सिंदेवाही तालुक्यातील ४३ पैकी २९ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बाजी मारली. यात सरडपार, पेठगाव, डोंगरगाव, चारगाव, कुकूडहेटी, रत्नापूर, मोहाळी, रामाळा, गडमौशी, मिनझरी, अंतरगाव, चिकमारा, विरव्हा, टेकरी, किन्ही, वानेरी, गुंजेवाही, वाकल, लोणखैरी आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.