चंद्रपूर बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

By Admin | Updated: April 19, 2016 05:15 IST2016-04-19T05:15:30+5:302016-04-19T05:15:30+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर

Congress supremacy in the Chandrapur market committee | चंद्रपूर बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

चंद्रपूर बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. यात काँग्रेस पक्षाने १३ जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. भाजपाला मात्र केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.
सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून दिनेश चोखारे २४९, गंगाधर वैद्य २४१, विजय बल्की २३८, गोविंदा कुडे २३४, चंद्रकांत गुरू २३०, विजय टोेंगे २२९ व योगेश बोबडे हे २१० मते घेऊन विजयी झाले. तर महिला गटातून अल्का वाढई २४५, शोभा वरारकर २४० मते घेऊन विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटातून निरज बोढे २५१, सहकारी संस्था (विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमाप्र) शिला मेकलवार या १८९ मते घेऊन विजयी झाले. हे सर्व उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत.
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून भाजपाचे उत्तम आंबळे २५६, सुनील फरकाडे हे २४२ मते घेऊन विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसुचित जाती,जमाती गटातून शोभा ठाकरे २६८, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून नामदेव जुनघरे २०७ तर व्यापारी गटातून भाजपाचे अरविंद चवरे २६३ व संतोष चिल्लावार १९५ मते घेऊन विजयी झाले. हमाल, मापारी गटातून अपक्ष उमेदवार प्रभाकर सिडाम हे ३१ मते घेऊन विजयी ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील नवघडे यांनी काम पाहिले. दोन कोटींवर उलाढाल असलेल्या बाजार समितीवर यापूर्वी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. (स्थानिक प्रतिनिधी)

मतमोजणी दरम्यान गोंधळ
४ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून भाजपाचे सुनील फरकाडे यांनी गोविंद उपरे यांचा २ मताने पराभव करीत २४२ मते घेऊन विजयी झाले. तेव्हा गोविंद उपरे यांनी आक्षेप नोंदवून परत मतमोजणीची मागणी केली. या दरम्यान मतमोजणी सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून उपस्थित कार्यकर्त्यांना बाहेर काढून परत मतमोजणी करण्यात आली. यात सुनील फरकाडे हे २ मताने विजयी झाले. तर हमाली, मापारी गटातून प्रभाकर सिडाम यांनी मारोती सिडाम यांचा केवळ १ मताने पराभव केला.

Web Title: Congress supremacy in the Chandrapur market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.