मूल कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व
By Admin | Updated: April 12, 2016 03:33 IST2016-04-12T03:33:16+5:302016-04-12T03:33:16+5:30
राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देत

मूल कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व
मूल : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देत काँग्रेसने आपले वर्चस्व निर्माण केले. १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १३ उमेदवार निवडून आलेत. भाजपाला ०३ जागेवरच समाधान मानावे लागले आहे. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या १३ विजयी उमेदवारात सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून संजय मारकवार, राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर, धनंजय चिंतावार, किशोर धडसे, राजेंद्र कन्नमवार, शांताराम कामडे, महिला राखीव गटातून मुक्ताबाई मडावी, बैनाबाई वाढई, इतर मागास प्रवर्गातून पद्माकर लेनगुरे, विजा,भज, विमुक्त गटातून संदीप कारमवार, ग्रामपंचायत मतदार संघातून अखिल गांगरेड्डीवार, प्रशांत बांबोळे आदींनी बाजी मारली. भाजपाच्या विजयी उमेदवारांत ग्रामपंचायत गटातून वैजयंती मारगोनवार, व्यापारी अडते गटातून रमेश गोयल, ग्रामपंचायत मतदार संघातून विवेक बुरांडे यांनी बाजी मारली, तर अपक्ष उमेदवार मारोती चिताडे हे व्यापारी अडते गटातून निवडून आले. हमाल-मापारी गटातून रमेश बरडे यांनी बाजी मारली. काँग्रेसला कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट बहुमत मिळाल्याने ठरल्याप्रमाणे काँग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष तथा नवनिर्वाचित संचालक घनश्याम येनुरकर यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. बाजार समितीची निवडणूक एकप्रकारे तालुक्याची निवडणूक असल्याने भाजपाचे वर्चस्व असलेल्या मतदार संघात नामुष्की पत्करण्याची वेळ आली असल्याचे दिसुन येते. भविष्यात होणाऱ्या नगर परिषद व पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीला एकप्रकारे धोक्याची घंटाच असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)