चिमूरच्या संस्थेवर काँग्रेस प्रणित पॅनलचा झेंडा
By Admin | Updated: April 23, 2015 01:07 IST2015-04-23T01:07:55+5:302015-04-23T01:07:55+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात नामांकीत असलेली चिमूर विविध कार्यकारी संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलचा विजय झाला.

चिमूरच्या संस्थेवर काँग्रेस प्रणित पॅनलचा झेंडा
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यात नामांकीत असलेली चिमूर विविध कार्यकारी संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलचा विजय झाला. आमदार भांगडिया यांच्या शेतकरी परिवर्तन सहकार पॅनलचा काँग्रेस प्रणित पॅनलने सफाया केला.
चिमूर विविध कार्यकारी संस्थेवर आजपर्यंत काँग्रेस प्रणित पॅनलचीच सत्ता राहिली आहे. यावेळी अनेक गट या निवडणुकीत उतरले. आमदार कीर्ती भांगडिया यांनी शेतकरी परिवर्तन पॅनल लढविले तर काँग्रेस प्रणित पॅनलचे माधव बिरजे यांनी १३ उमेदवार रिंगणात उतरवीत १२ जागेवर विजय संपादन केला. आमदार भांगडिया यांच्या पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. यात अॅड. नवयुक कामडी हे विजयी झाले. तर काँग्रेस प्रणित पॅनलमध्ये माधव बिरजे, राजू लोणारे, बाळकृष्ण बोभाटे, जगदिश लाखे, विकास शिंदे, प्रकाश बोकारे, सुरेश हिंगे, विकास नवले, देविदास मोहीनकर, गोपाल सावरकर, लिला कामडी, रेखा धानोरकर विजयी झाले.
या निवडणुकीत तिसऱ्या गटाने जागा लढविल्या. परंतु, त्यांना खाताही उघडता आले नाही. निवडणुकीचे निकाल काँग्रेस प्रणित पॅनलकडे लागत असताना फटाक्याची आतिषबाजी करून शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्हा परिषदेचे गटनेते सतिश वारजूकर, संजय डोंगरे, संजय कुंभारे, सुधीर पंडीलवार, राजू हिंगणकर, भीमराव ठावरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. अगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. (तालुका प्रतिनिधी)