हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ चंद्रपुरात काँग्रेसचा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST2020-10-06T05:00:00+5:302020-10-06T05:00:20+5:30

हाथरस घटनेच्या प्रकरणाच्या पोलिसांच्या चौकशीवर कुणीच समाधानी नाही, त्यामुळे हाथरस प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली दिला जावा, देशाचे राष्ट्रपती दलित आहेत. त्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी केली.

Congress Satyagraha in Chandrapur to protest Hathras case | हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ चंद्रपुरात काँग्रेसचा सत्याग्रह

हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ चंद्रपुरात काँग्रेसचा सत्याग्रह

ठळक मुद्देठिकठिकाणी निवेदन : राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा - प्रतिभा धानोरकर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील गांधी चौकात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
हाथरस घटनेच्या प्रकरणाच्या पोलिसांच्या चौकशीवर कुणीच समाधानी नाही, त्यामुळे हाथरस प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली दिला जावा, देशाचे राष्ट्रपती दलित आहेत. त्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी केली. आंदोलनात चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, जि.प. सदस्य ममता घनश्याम डुकरे, अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव मलक शाकीर, महाराष्ट्र अ. जा. उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अनुताई दहेगावकर, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, एन. एस. यु. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, नगरसेविका संगीता भोयर, ललिता रेवल्लीवार, नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, मंगेश डांगे उपस्थित होते.

पोंभुर्णात वंचित बहुजन आघाडीचेतहसीलदारांना निवेदन
घोसरी : उत्तर प्रदेश येथील हाथरस प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन पोंभुर्णा येथे वंचित बहुजन आघाडी तालुका व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रहास उराडे यांच्यासह रवी तेलसे, श्यामकुमार गेडाम, अतुल वाकडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड रंजित खोब्रागडे, संदीप निमसरकार, रघुनाथ उराडे, शहर अध्यक्ष राजु खोब्रागडे, जिल्हा प्रमुख आयटी सेल अविनाश वाळके, महेंद्र उराडे, सुनील दुर्गे, संतोष कवठे, मुन्ना घडसे, विजयकुमार दुर्गे, प्रकाश. एस .तावाडे आदी पदाधिकारी होते.
 

Web Title: Congress Satyagraha in Chandrapur to protest Hathras case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.