पोंभूर्णात काँग्रेसची आढावा सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:32+5:302021-01-13T05:13:32+5:30
पोंभूर्णा नगरपंचायत निवडणूकसंदर्भात काँग्रेसच्या आढावा सभेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवताळे, प्रदेश सदस्य घनश्याम मुलचंदानी, ...

पोंभूर्णात काँग्रेसची आढावा सभा
पोंभूर्णा नगरपंचायत निवडणूकसंदर्भात काँग्रेसच्या आढावा सभेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवताळे, प्रदेश सदस्य घनश्याम मुलचंदानी, कवडू कुंदावार, अतिक कुरेशी, विजय मेश्राम, अरविंद मडावी यांची उपस्थिती होती.
करोडो रुपयांच्या शासकीय निधीचा दुरुपयोग झाला असताना, सिंचन, रोजगार, शेतीचा विकास, घरकुलसारखे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांनी याबाबत मतदारांपर्यंत वास्तविक स्वरूप पोहोचविण्याचे कार्य करावे, असे विचार प्रकाश देवताळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी घनश्याम मुलचंदानी, विजय मेश्राम यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. सभेचे प्रस्ताविक कवडू कुन्दावार यांनी केले. संचालन अतिक कुरेशी, आभार साईनाथ शिन्दे यांनी केले. यावेळी जयपाल गेडाम, पराग मुलकलवार, अशोक सिडाम, आनंद पातळे, अशोक गेडाम, बंडू गिरसावळे, नारायण कानमपल्लीवार, दत्तू येल्लूरवार, मनोहर वनकर, गौतम वनकर, मुकुंदा टेकाम, शंकर दुधलकर उपस्थित होते.