तेलाच्या दरवाढीचा कॉंग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:46+5:302021-06-20T04:19:46+5:30

सिंदेवाही : खाद्यतेल व इंधन दरवाढीबाबत केंद्र सरकारचा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तालुका काँग्रेस व महिला काँग्रेस युवक ...

Congress protests oil price hike | तेलाच्या दरवाढीचा कॉंग्रेसकडून निषेध

तेलाच्या दरवाढीचा कॉंग्रेसकडून निषेध

सिंदेवाही : खाद्यतेल व इंधन दरवाढीबाबत केंद्र सरकारचा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तालुका काँग्रेस व महिला काँग्रेस युवक काँग्रेस यांच्या वतीने शुक्रवारी शिवाजी चौक ते महाजन इंडियन गॅस एजन्सीसमोर जन आंदोलन करून निषेध करण्यात आला.

यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, ब्रह्मपुरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा नगरपंचायत सिंदेवाहीचे उपाध्यक्ष स्वप्नील कावळे, नगराध्यक्ष आशा गंडाटे, लोनवाहीचे सरपंच नेहा समर्थ, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मयूर सुचक, नगरसेवक युनूस शेख, भूपेश लाखे, नरेंद्र भैसारे, मंदा मडावी आदी उपस्थित होते.

Web Title: Congress protests oil price hike