घुग्घुसच्या शुभम फुटाणेला काॅंग्रेसकडून श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:17 IST2021-02-19T04:17:47+5:302021-02-19T04:17:47+5:30
घुग्घुस : मागील २८ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या २५ वर्षीय शुभम दिलीप फुटाणे याची अपहरणकर्त्याने हत्या केली. त्या शुभमच्या आत्म्याला ...

घुग्घुसच्या शुभम फुटाणेला काॅंग्रेसकडून श्रध्दांजली
घुग्घुस : मागील २८ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या २५ वर्षीय शुभम दिलीप फुटाणे याची अपहरणकर्त्याने हत्या केली. त्या शुभमच्या आत्म्याला शांती मिळो, यासाठी घुग्घुस शहर काॅंग्रेसच्या वतीने काॅंग्रेस कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यासोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवून मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
यावेळी घुग्घुस शहर कॉंग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी, किसान सेलचे अध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेता अनवर सैयद, अनिरुद्ध आवळे, प्रफुल हिकरे, शहजाद शेख ,जावेद कुरेशी, बालकिशन कुळसंगे ,देव भंडारी, विशाल मादर, रोशन दंतलवार, संपत कोंकटी, सुधाकर जुनारकर, रणजित राखुंडे,
सुनील पाटील,संगीत बोबडे, विजया बंडेवार, सरस्वता पाटील, दुर्गा पाटील, अमिना बेगम आदींची उपस्थिती होती.