शेतकरीविरोधी कायद्याची काँँग्रेसकडून होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST2021-06-20T04:20:12+5:302021-06-20T04:20:12+5:30

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात दुपारी ...

Congress passes anti-farmer law | शेतकरीविरोधी कायद्याची काँँग्रेसकडून होळी

शेतकरीविरोधी कायद्याची काँँग्रेसकडून होळी

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची होळी करण्यात आली. यावेळी खासदार बाळू धानोरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. खासदार धानोरकर म्हणाले की, देशात कोरोनाने हाहाकार माजविला असताना उपाययोजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले. महागाई, इंधन दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सरकारच्या भक्तांनाही त्रास सहन करावा लागत आहे; परंतु भक्त काहीही बोलू शकत नाही. यापूर्वी महागाई वाढली म्हणून रस्त्यावर उतरणारे भाजपचे नेते कुठेच दिसत नाही, अशी टीकाही केली.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, प्रकाश देवतळे, प्रवीण पडवेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, उमाकांत धांडे, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनु. दहेगावकर, सोहेल शेख, अमजद अली, शालिनी भगत, हरीश कोत्तावर रूचीत दवे, राजेश अडूर, इर्शाद शेख, नरेंद्र बोबडे, स्वाती त्रिवेदी, सुनंदा धोबे, वानी डारला, संध्या पिंपळकर, शीतल कातकर, लता बारापात्रे, प्रशांत भारती, सुलेमान अली, कृणाल रामटेके, मोहन डोंगरे, चंद्र्रमा यादव, नौशाद शेख, केतन दुर्सेलवार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, प्रकाश देशभ्रतार, रूषभ दुपारे, धीरज उरकुडे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Congress passes anti-farmer law