काँग्रेसने पाळला विश्वासघात दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:56 IST2018-05-26T22:56:09+5:302018-05-26T22:56:39+5:30
भाजपा सरकारला केंद्रात सत्ता स्थापन करून चार वर्षे पूर्ण झाले. मात्र, जनहितविरोधी धोरणे राबवून नागरिकांचा अपेक्षाभंग केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शनिवारी विश्वासघात दिन पाळण्यात आला. दरम्यान, पेट्रोल व डिझेलचे वाढते दर, आणि बेरोजगारांची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप करून बैलबंडीवर दुचाकी ठेवून शहरातून रॅली काढण्यात आली.

काँग्रेसने पाळला विश्वासघात दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भाजपा सरकारला केंद्रात सत्ता स्थापन करून चार वर्षे पूर्ण झाले. मात्र, जनहितविरोधी धोरणे राबवून नागरिकांचा अपेक्षाभंग केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शनिवारी विश्वासघात दिन पाळण्यात आला. दरम्यान, पेट्रोल व डिझेलचे वाढते दर, आणि बेरोजगारांची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप करून बैलबंडीवर दुचाकी ठेवून शहरातून रॅली काढण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शनिवारी चार वर्षे पूर्ण केले. या काळात मोदी सरकारला सर्वच आघाड्यांवर अपयश आले. निवडणुकीदरम्यान दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने महागाई आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. युवक, शेतकरी, व्यापारी, महिला व विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणतीही धोरणे न राबविल्याचा आरोप करून काँग्रेसने विश्वासघात दिन पाळला. चंद्रपूर शहर जिल्हा कमिटीच्या वतीने सकाळी १० वाजता हाताला काळी फीत बाधून बैलबंडीवर मोटर सायकल ठेवण्यात आली. त्यावर ‘यह गाडी बेचना है’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजना राबविण्यात आल्या नाहीत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाºया योजनांचा निधी कमी करण्यात आला. अल्पसंख्याक समुदायावर धार्मिक अत्याचार सुरू असूनही केंद्र सरकार व राज्य सरकारने आळा घातला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शहरातील प्रमुख मार्गाने रॅली काढल्यानंतर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आंदोलना सांगता करण्यात आली.
यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, के. के. सिंग, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. मलक शाकीर, सचिन कत्याल, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, विनोद संकत, निखिल धनवलकर, शालिनी भगत, वंदना भागवत, अनुसूचित जाती विभाग शहर अध्यक्ष हरिदास लांडे, अनिल सुरपाम, सुर्यकांत खनके, आसिफ हुसेन, फारूक सिद्धकी, हाजी हारून, अॅड. भास्कर दिवसे, मोहन डोंगरे, प्रकाश अधिकारी, सुनिता अग्रवाल, संतोष लहामगे, राजकुमार रेवल्लीवार, राजू दास, श्याम राजूरकर, दीपक कटकोजवार, सुरेश आत्राम, वकार काजी, बंडोपंत तातावार आदी उपस्थित होते.
केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. या काळात जनतेला केवळ आश्वासने मिळाली. त्यामुळे युवक, बेरोजगार, शेतकरी, मजूर व उद्योगांना मोठा फटका बसला. केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले, अशी टीका काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शनिवारी धरणे आंदोलनादरम्यान पत्रपरिषदेत केली. गांधी चौकात जिल्हा किसान मजदूर काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेसच्या फ्रंटल संघटनेच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन केले. आंदोलनात राहूल पुगलिया, मनपाचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रशांत दानव, जि.प. सदस्य शिवचंद काळे, गोदरू जुमनाके, देवेंद्र बेले, प्रवीण पडवेकर, माजी जि.प. सदस्य अविनाश जाधव, रामभाऊ टोंगे, अॅड. अविनाश ठावरी, अॅड. अरुण धोटे, गंगाधर वैद्य, ओमेश्वर पद्मगीरीवार, रोशनलाल बिट्टू, वसंत मांढरे, नासीरखान, अनेकश्वर मेश्राम, माजी जि.प. सदस्य विनोद अहीरकर, साईनाथ बुच्चे, देवेंद्र गहलोत, अनु दहेगावकर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.