मनपातील कारभाराविरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे मुंडण
By Admin | Updated: March 17, 2015 00:56 IST2015-03-17T00:56:03+5:302015-03-17T00:56:03+5:30
चंद्रपूर शहर महानगर पालिकेत भाजप पदाधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. भाजपा प्रणित पदाधिकारी महापौर

मनपातील कारभाराविरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे मुंडण
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगर पालिकेत भाजप पदाधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. भाजपा प्रणित पदाधिकारी महापौर व उपमहापौर व कचरा घोटाळ्याच्या विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीतर्फे साखळी उपोषणाला सुरुवात करून मुंडण आंदोलन केले.
गांधी चौकातील महात्मा गांधी यांचा पुतळ्यास मालार्पण करून शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी मौन पाळून उपोषणास सुरवात केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे महापौर व उपमहापौर यांच्या भोंगळ कारभाराविरूद्ध माजी जिल्हा अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सुनिता लोढीया, काँग्रेस प्रदेश महासचिव (अनु. जाती) संजय रत्नपारखी, एन.एस.यु.आय. अध्यक्ष कुणाल चहारे, चंद्रपूर जिल्हा महिलाध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, वंदना भागवत, शहर सचिव अॅड. मलक शाकिर, माजी नगरसेवक सुधीर कारंगल, नगर उपाध्यक्ष बंडोपंत तातावार, नगर उपाध्यक्ष मो. सुलेमान अली, नगर उपाध्यक्ष प्रफुल जाधव, विरेंद्र लोढीया, नगर महासचिव केशव रामटेके, नगर महासचिव दीपक कठकोजवार, नगर सचिव सुरेश दुर्शेलवार, अनवर अली मुन्ना शाह, संतोष कुर्रा, करिम शेख यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर दुपारी ३ वाजता महापौर व उपमहापौर यांच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा (शहर) अध्यक्ष नंदु नागरकर, माजी नगरसेवक सुधीर कारंगल, शहर उपाध्यक्ष मो. सुलेमान अली, संतोष कुर्रा, दीपक मल्लीक, लिलाधर जंजीलवार, धनपंत उके यांनी मुंडण करून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी रमेश पारनंदी, राजु दास, राजा काझी, सुभाष दोनाडे, विकास ठिकेदार, स्वपेश ताजने, राहुल हडपे, संतोष हनुमंते, सुचिन चहारे, महिला बचतगटचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रक वाटण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)