काँग्रेसच्या नवनियुक्त जि.प. सदस्यांचा सत्कार
By Admin | Updated: March 23, 2017 00:36 IST2017-03-23T00:36:43+5:302017-03-23T00:36:43+5:30
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने इंटक भवनात नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांचा व पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती व सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

काँग्रेसच्या नवनियुक्त जि.प. सदस्यांचा सत्कार
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने इंटक भवनात नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांचा व पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती व सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी काँग्रेस विधीमंडळ गटनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजुरकर व जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत जिल्हा परिषदेच्या गटनेते पदी सतिश वारजुकर व उपगटनेते पदी रमाकांत लोधे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी विधानसभा उमेदवार घनश्याम मुलचंदानी, महेश मेंढे, माजी अध्यक्ष सुभाष गौर, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, महिला अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लहामगे, मनपाचे सभागृह नेता रामु तिवारी, माजी महापौर संगिता अमृतकर, युवक अध्यक्ष शिवा राव, जि.प. सदस्य राजेश कांबळे, गजानन बुटके, शिवानंद काळे, सुनंदा जिवतोडे, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर कायरकर व सर्व तालुकाध्यक्ष गोदरू पाटील जुमनाके, प्रफुल खापर्डे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)