नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक
By Admin | Updated: October 8, 2015 00:42 IST2015-10-08T00:42:59+5:302015-10-08T00:42:59+5:30
येथे होवू घातलेल्या नगर पंचायत निवडणुकीची आढावा बैठक नुकतीच पोंभुर्णा येथील काँग्रेस कमेटी कार्यालयात पार पडली.

नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक
प्रकाश देवतळेंचे मार्गदर्शन : एकजुटीने लढण्याचे आवाहन
पोंभुर्णा : येथे होवू घातलेल्या नगर पंचायत निवडणुकीची आढावा बैठक नुकतीच पोंभुर्णा येथील काँग्रेस कमेटी कार्यालयात पार पडली. आढावा बैठकीला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते घनशाम मुलचंदानी, जिल्हा महासचिव संजय महाडोरे, वाघधरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रकाश देवतळे म्हणाले, पोंभुर्णा नगर पंचायतीची ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण कार्यकर्त्यांनी आपसातील हेवेदावे विसरून एकसंघतेने निवडणुकीचे कार्य पार पाडावे आणि आपल्या एकजुटीच्या शक्तीने पोंभुर्णा नगर पंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.
घनशाम मुलचंदानी यांनी नगर पंचायतीवर काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे असून प्रत्येकानी कामाला लागावे असे सांगितले.
या बैठकीला काँग्रेस तालुकाध्यक्ष ओमेश्वर पद्मगिरीवार, सचिव राजेंद्र मोरे, महाजनवार, राकेश नैताम, गजानन मडपुवार, मुकुंदा टेकाम, मुरलीधर टेकाम, नंदू बुरांडे, सचिन रणदिवे यांच्यासह पोंभूर्णा येथील महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)