धडक मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसची चंद्रपुरात बैठक

By Admin | Updated: December 7, 2015 05:19 IST2015-12-07T05:19:09+5:302015-12-07T05:19:09+5:30

८ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर होणाऱ्या धडक मोर्चा संदर्भात मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस

Congress meeting in Chandrapur for the pre-election rally | धडक मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसची चंद्रपुरात बैठक

धडक मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसची चंद्रपुरात बैठक

चंद्रपूर : ८ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर होणाऱ्या धडक मोर्चा संदर्भात मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात शनिवारी सभा पार पडली.
या सभेला अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रदेश सचिव सुनीता लोढिया, शहर उपाध्यक्ष अ‍ॅड. विजय मोगरे, महाराष्ट्र अनु. सुची जाती विभाग महासचिव संजय रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोर्चा संबंधात मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी केशव रामटेके, सुलेमान अली, श्याम राजुरकर, विनोद संकत, दीपक कटकोजवार, राजू सारीडेक, विजय आ. चहारे, सुरेश दुर्शलवार, वंदना भागवत, वैशाली गेडाम, बंडोपंत तातावार, अनिल सचिन चहारे, अनिल सुरपाम, संजय पाटील, देवा कंटावार, माणीकराव बरबटकर, श्रीकृष्ण नंदुरकर, अनवर अली, मुन्ना शाह, राहुल गावंडे, अनिल लांजेवार, श्रीवर देशपांडे, सागर खोब्रागडे, अमोल कालपल्लीवार, अरुण हजारे, मनोज वानखेडे, श्रीकांत बोकडे, अतुल वानखेडे, अजय दास तसेच जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Congress meeting in Chandrapur for the pre-election rally