शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

काँग्रेसच्या बड्या नेत्याची मुलगी लोकसभेच्या रिंगणात?; शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाकडे मागितलं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 3:34 PM

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे.

Congress Shivani Wadettiwar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा पुढील आठवडाभरात होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने  इच्छुकांनीही कंबर कसली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता आणि ती जागा होती चंद्रपूर लोकसभेची. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता. मात्र मागील वर्षी त्यांचं निधन झालं. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. याच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. या मतदारसंघातून आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचंही शिवानी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स हँडलवर याबाबतची पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "गेल्या सात वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरं तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करायची होती. मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या या सरकारने जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाही. त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार," असा निर्धार शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या तिकिटाबाबत बोलताना शिवानी यांनी म्हटलं आहे की, "लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी या संघर्ष करत असताना मी देखील त्यात खारीचा वाटा उचलत आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चे काढून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केला. कामगार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विविध स्पर्धा आणि उपक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गाला पक्षाशी जोडले. संसदेत काँग्रेस पक्षाचा आवाज मजबूत करण्यासाठीच ज्येष्ठांपासून ते नवमतदारांचा मला उमेदवारी करण्यासाठी आग्रह आहे. म्हणूनच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी देण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाकडे असून त्यांचा निर्णय मला मान्य असेल," असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यादेखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसकडून नक्की कोणाला तिकीट दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारchandrapur-pcचंद्रपूरcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४