चंद्रपूर बाजार समितीमध्ये काँग्रेसचेच वर्चस्व; वरोरामध्ये ईश्वर चिठ्ठीने निवड
By साईनाथ कुचनकार | Updated: May 12, 2023 17:18 IST2023-05-12T17:18:32+5:302023-05-12T17:18:51+5:30
विजयानंतर गुलाल उधळत केला जल्लोष

चंद्रपूर बाजार समितीमध्ये काँग्रेसचेच वर्चस्व; वरोरामध्ये ईश्वर चिठ्ठीने निवड
साईनाथ कुचनकार/ चंद्रपूर
चंद्रपूर : जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या बाजार समितींपैकी सहा बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. राजकीय पक्षांनी ही निवडणूक विविध पॅनलच्या माध्यमातून लढविली असली तरी जिल्ह्यात बाजार समितीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व बघायला मिळत आहे. दरम्यान, वरोरा बाजार समितीमध्ये दोन्ही पॅनलकडे समसमान संचालक असल्याने येथे ईश्वर चिठ्ठीने सभापती, उपसभापतींची निवडणूक करण्यात आली.
कोरपना : सभापती अशोक बावणे, उपसभापती वंदना बल्की
मूल : सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार
वरोरा: सभापती विजय देवतळे, उपसभापतीपदी जयंत टेमुर्डे
चंद्रपूर : सभापती गंगाधर वैद्य, उपसभापती गोविंदा पोडे
चिमूर :सभापती मंगेश धाडसे, उपसभापती रवींद्र पंधरे
ब्रह्मपुरी: सभापती प्रभाकर सेलोकर, उपसभापती सुनीता तिडके