काँग्रेसने देशाचे वाटोळे केले

By Admin | Updated: February 20, 2016 01:54 IST2016-02-20T01:54:20+5:302016-02-20T01:54:20+5:30

काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असून भाजपा देशाच्या हिताचे कार्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना, ...

Congress has defeated the country | काँग्रेसने देशाचे वाटोळे केले

काँग्रेसने देशाचे वाटोळे केले

हंसराज अहीर : आबीद अली यांच्यासह कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश
राजुरा/ कोरपना : काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असून भाजपा देशाच्या हिताचे कार्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना, बेरोजगारांना काम देण्याच्या योजना भाजपा आखत असून सिंचन क्षेत्र दुप्पट झाले पाहिजे, यासाठी भाजपा प्रयत्नरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय उर्वरक व रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
कोरपना येथे शेतकरी मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रम गुरूवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राजुऱ्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, चंदनसिंग चंदेल, राजु घरोटे, सतीश धोटे, राहुल सराफ, शिवाजी सेलोकर, नारायण हिवरकर, राजेश मून, केशव निरमाजी, महेश देवकते, वाघू गेडाम, अरुण मस्की उपस्थित होते. राज्यात मोठे उद्योग आले पाहिजे, देशात महाराष्ट्राची मान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस अनेक योजना कार्यान्वित करीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सय्यद आबीद अली यांच्यासह एक हजार कार्यकर्त्यांचा प्रवेश झाल्याची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन वासुदेव आवारी तर आभार सुहेल अली यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Congress has defeated the country