देशाला दिशा देण्याची क्षमता काँग्रेस पक्षातच
By Admin | Updated: August 9, 2016 00:47 IST2016-08-09T00:47:46+5:302016-08-09T00:47:46+5:30
देशात सध्याचे भाजप सरकार केवळ खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम प्रसारमाध्यमांना हाताशी ...

देशाला दिशा देण्याची क्षमता काँग्रेस पक्षातच
सुभाष धोटे : कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळेच निवडणुकीत पक्षाला यश
राजुरा : देशात सध्याचे भाजप सरकार केवळ खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम प्रसारमाध्यमांना हाताशी धरून मोठ्या जोरकसमध्ये करीत आहे. विकासाची मोठमोठी आकडे केवळ फुगवून सांगण्याचे काम करीत आहे. मात्र देशाला दिशा देण्याची खरी क्षमता केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षातच आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा जेष्ठ नेते बाबुराव तिडके यांनी केले.
शनिवारी राजुरा येथील एका सभागृहात पार पडलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे सरचिटणीस माजी आ. सुभाष धोटे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश पुढेही कायम रहावे यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे. पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते माजी आ. प्रभाकर मामुलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव सुभाष धोटे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हा अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, विनोद दत्तात्रय, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष शिवाराव पोलशेट्टी, तालुकाध्यक्ष दादा पा. लांडे, विठ्ठलराव थिपे, राजीवसिंह चंदेल, सुरेखा चिडे, क्रांती नालमवार, सत्यनारायण अग्रवाल, पंचायत समिती सभापती निर्मला कुळमेथे, रत्नमाला तोरे, उपसभापती रामचंद्र कुरवटकर, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, नानाजी आदे, अविनाश जाधव, जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, दिलीप नलगे, राजुराच्या नगराध्यक्ष मंगला आत्राम, कोरपनाच्या नगराध्यक्षा नंदा बावणे, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, गटनेता स्वामी येरोलवार, पापया पोनमवार, सुनिल देशपांडे, पंचायत समिती सदस्य अब्दुल जमीर, भीमया अंगलवार, हर्षा चांदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले यांनी केले. प्रास्ताविक दादा पा. लांडे यांनी तर आभार आशिष देरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस युवक काँग्रेसचे पदाधिकारी, महिलांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)