सिंदेवाहीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:30+5:302021-07-18T04:20:30+5:30
सिंदेवाही : पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या दरवाढीविरोधात सिंदेवाही तालुका काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. रॅलीची ...

सिंदेवाहीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
सिंदेवाही : पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या दरवाढीविरोधात सिंदेवाही तालुका काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
रॅलीची सुरुवात दसरा चौकापासून करण्यात आली. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, सिलिंडरच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुनील उत्तरवार, ब्रह्मपुरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरपंचायत उपाध्यक्ष स्वप्नील कावडे, नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आशा गंडाटे, गटनेता नरेंद्र सारे, नगरसेवक युनूस शेख, भूपेश लाखे, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच योगेश बोरकुंडवार, राजू शेख, राहुल पोरदिवार, सचिन नाट्मवार, योगेश कोकुलवार, भास्कर नंनवार, रवी सावकुडे आदी उपस्थित होते.