काँग्रेस कमेटीचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: September 4, 2016 00:44 IST2016-09-04T00:44:58+5:302016-09-04T00:44:58+5:30
महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनॅशनल सिक्युरिटी २०१६ अॅक्टच्या निषेधार्थ आज शनिवारी येथील जटपुरा ...

काँग्रेस कमेटीचे धरणे आंदोलन
चंद्रपूर : महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनॅशनल सिक्युरिटी २०१६ अॅक्टच्या निषेधार्थ आज शनिवारी येथील जटपुरा गेटजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले.
महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनॅशनल सिक्युरिटी २०१६ या कायद्यांतर्गत सामान्य नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या शासनाच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणा देत नारेबाजी करण्यात आली.
याप्रसंगी माजी अध्यक्ष विनायक बांगडे, माजी प्रदेश सचिव सुनिता लोढीया, शहर उपाध्यक्ष विजय मोगरे, असंघटित कामगार विभाग अध्यक्ष अनिल सुरपाम, युवक काँग्रेस जिल्हा सचिव पंकज जवादे, केशव रामटेके, सुरेश दुर्सेलवार, अनवर अली, मुन्ना शाह, श्रीकृष्ण नंदूरकर, श्रीकांत चहारे, अॅड. विजय आमटे, पुंडलिक लांबट, मोहन डोंगरे, बाबाराव ठाकरे, जहीर काझी, एम.एस. गोरे, राजकुमार रेवेल्लीवार, इकबाल हुसेन, राजू दास, राजा काझी, शाम राजूरकर, निखील धनवलकर, दीपक हुमानी, सचिन चहारे, ओ.डी. सरगर, ज्ञानदेव जुनघरे, वैभव बनकडे, प्रा.अनिल शिंदे आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)