राजुरा विधानसभा क्षेत्रातील ४६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:47+5:302021-01-19T04:29:47+5:30
राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील एकूण ८९ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्राचे ...

राजुरा विधानसभा क्षेत्रातील ४६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा
राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील एकूण ८९ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा तालुक्यातील १५, कोरपना तालुक्यातील ८ व गोंडपिपरी तालुक्यातील २३ अशा एकूण ४६ ग्रामपंचायतींवर दावा केला. स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून हा विजय मिळवला. विकासकामांवर जनतेने उमटवलेली ही विजयी मोहर असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, अशोक देशपांडे, शेखर धोटे, अभिजीत धोटे, संतोष गटलेवार, एजाज अहेमद, अशोक राव, संतोष शेंडे, जावेद अब्दुल, विजय उपरे, पंढरी चन्ने, प्रणय लांडे, शाहनवाज कुरेशी, आकाश मावलीकर, साबीर सय्यद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राजुरा तालुक्यातील बामनवाडा, चनाखा, पंचाळा, सिंधी, विहीरगाव, कविठपेठ, चंदनवाही, मुठरा, कडमना, नलफडी, मूर्ती, चार्ली या १२ आणि गोवरी (काँग्रेस आघाडी), मारडा (काँग्रेस आघाडी), वरोडा (काँग्रेस आघाडी) या ३ अशा एकूण १५ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. भाजपने चुनाळा, सातरी, कोहपरा, धानोरा, चिंचोली बु, सुमठाणा, खामोना, पेल्लोरा या आठ, तर शेतकरी संघटनने चिंचोली खु. या एका तर अपक्षांनी कोलगाव, पवनी, धिडसी, कडोली बु. या चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.
कोरपना तालुक्यातील शेरज बु., तळोधी, गाडेगाव, नांदगाव, भोयगाव, कढोली, हिरापूर (काँग्रेस आघाडी), सांगोडा (काँग्रेस आघाडी) अशा आठ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे. तर भाजपने कोडसी, लोणी, पिपरी, शेरज खु., नारंडा या पाच व शेतकरी संघटनेने भारोसा, आवाळपूर, वनोजा, कोडसी खु. या चार ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे.
जिवती तालुक्यातील एकमेव परमडोली ग्रामपंचायतीचा निकाल संमिश्र आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी, सालेझरी, विहीरगाव, वटराना, वेजगाव, लाठी, वेडगाव, सखनूर, हेटीनांदगाव, सोमनपल्ली, वडकुली, तारसा बु., कोरंबी, पोडसा, नंदवर्धन, बेरडी, बोरगाव, सुपगाव, धामणगाव, दरूर, पारगाव, डोंगरगाव, तोहोगाव (काँग्रेस आघाडी) अशा एकूण २३ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे. तर भाजपने भांगाराम तळोधी, धाबा, खराडपेठ, धानापूर, सोनापूर, हिवरा, चेक लिखितवाडा, चेक बोरगाव, पानोरा, अडेगाव, चेकदरुर, चेक पिपरी या १२ ग्रामपंचायतींवर तर शेतकरी संघटनेने विठ्ठलवाडा, राष्ट्रवादी काँग्रेसने वडोली, शिवसेनेने तारडा, अपक्षांनी आक्सापूर, करंजी, पुरडी हेटी, किरमिरी, चेक घडोली या चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.