सावलीत ३० ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST2021-02-20T05:22:41+5:302021-02-20T05:22:41+5:30

सावली तालुका हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदार संघ असल्याने त्यांच्या नेतृत्वात येथील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीदरम्यान संदीप ...

Congress claims 30 gram panchayats in the shadow | सावलीत ३० ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा

सावलीत ३० ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा

सावली तालुका हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदार संघ असल्याने त्यांच्या नेतृत्वात येथील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीदरम्यान संदीप गड्डमवार यांचा काँग्रेस प्रवेश झाला. ५० ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतींवर काँग्रेस पक्षाने सत्ता हस्तगत केली. ३० पैकी घोडेवाही ग्रामपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करण्यात आली. २० ग्रामपंचायतींमध्ये भाजपने आपला झेंडा कायम ठेवण्यात यश मिळविले. काँग्रेसने चारगाव, चक पिरंजी, जिबगाव, कवठी, व्याहाड खुर्द, कापसी, हरंबा, लोंढोली, चिखली, उसेगाव, घोडेवाही, अंतरगाव, बेलगाव, डोंगरगाव, केरोडा, आकापूर, कसरगाव, निमगाव, निलसनी पेटगाव, कोंडेखल, करोली, मेहाबुज, सायखेडा, उसरपार चक, उपरी, कढोली, जाम बूज, चिचबोडी, पेंढरी मक्ता, हिरापूर, तर भाजपने व्याहाड बूज, सामदा बूज, सोनापूर, पारडी, चांदली बूज, खेडी, साखरी, डोनाळा, थेरगाव, निफन्द्रा, गेवरा, पालेबरसा, मंगरमेंढा, करगाव, मुंडाळा, वाघोली, विहिरगाव, बोरमाळा, तर पाथरी ग्रामपंचायतीत प्रहार पुरस्कृत ग्रामविकास आघाडीने सत्ता स्थापन केली.

Web Title: Congress claims 30 gram panchayats in the shadow