नागभीड येथे काँग्रेसचा घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:24 IST2017-09-29T00:24:30+5:302017-09-29T00:24:43+5:30
नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी गुरूवारी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

नागभीड येथे काँग्रेसचा घंटानाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी गुरूवारी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची सुरूवात माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आली. यावेळी डॉ. अविनाश वारजूकर, जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते पंजाबराव गावंडे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, जि.प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, पं.स. सभापती रवी देशमुख यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खेड्यापाड्यातील शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
नागभीड येथील प्रमुख मार्गाने शासनाविरोधात विविध घोषणा आंदोलक देत होते. त्यानंतर येथील राममंदिर चौकात आंदोलनाला अनेकांनी संबोधित केले. केंद्र आणि राज्यात सत्तारूढ असलेले सरकार सर्वसामान्य जनतेच्या विरोधात आहे. या सरकारला फक्त भांडवलदारांचेच हीत जोपासायचे आहे. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकºयांना वेठीस धरले आहे. शासनाच्या धोरणांनी जनता हैरान आहे, असे विविध आरोप या नेत्यांनी आपल्या भाषणातून केला.यानंतर तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी एक शिष्टमंडळाने तहसीलदार यांना विविध मांगण्याचे निवेदन दिले. या मोर्चात जि.प. सदस्य गोपाल दडमल, जि.प. सदस्य नयना गेडाम, न.प. चे काँग्रेस गटनेते दिनेश गावंडे, नगरसेवक शिरीष वानखेडे, पं.स. सदस्य रंजना पेंदाम, श्यामसुंदर पुरकाम, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद बोरकर, पुरुषोत्तम बगमारे, रामकृष्ण देशमुख, नगरसेवक प्रतिक असीन, मोठू पिसे, नासिर शेख व शेतकरी सहभागी झाले होते.