अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST2021-01-23T04:28:40+5:302021-01-23T04:28:40+5:30

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्त्वात आंदोलन चंद्रपूर : टीआरपीप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस ...

Congress arrests Arnab Goswami | अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी काँग्रेसचे धरणे

अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी काँग्रेसचे धरणे

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्त्वात आंदोलन

चंद्रपूर : टीआरपीप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश ऊर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी केली. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य-ठेमस्कर , महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, अनू दहेगावकर यांनी यावेळी निषोध नोंदविला.

आंदोलनात महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहिलभाई शेख, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, नगरसेवक नीलेश खोब्रागड़े, किसान सेलचे अध्यक्ष भालचंद्र दानव, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, माजी नगरसेवक प्रवीण पड़वेकर, माजी नगरसेवक राजू रेवल्लीवार, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, घुग्घुसचे माजी अध्यक्ष जावेद सिद्दिकी, नरेंद्र बोबडे, मोहन डोंगरे, कुणाल चहारे, रुचित दवे, राजेश अड्डूर, राहिल कादर, इरफ़ान शेख, संजय रत्नपारखी, कृणाल रामटेके, सुनीता धोटे, सुरेखा चिड़े, एकता गुरले, बापू अंसारी, सूरज कन्नूर, काशिफ अली, केतन दुर्सेलवार, केशव रामटेके, राजेशसिंग चव्हाण, राजेश वर्मा, वैभव येरगुड़े, मोनू रामटेके, आशीष उराडे, निहाल शेख, नीतेश राहुरकडे, पप्पू सिद्दिकी, धरमू तिवारी, रितू दुर्गे, राकेश पिंपळकर, महेश पुजारी, रवी रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Congress arrests Arnab Goswami