चंद्रपुरात काँग्रेस कमेटीच्या वतीने हुतात्म्यांना आदरांजली

By Admin | Updated: August 10, 2015 00:37 IST2015-08-10T00:37:31+5:302015-08-10T00:37:31+5:30

चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमेटीच्या वतीने रविवारी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारक वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे पुष्पचक्र वाहून आदरांजलीचा वाहण्यात आली.

Congratulations to the martyrs of Chandrapur Congress Committee | चंद्रपुरात काँग्रेस कमेटीच्या वतीने हुतात्म्यांना आदरांजली

चंद्रपुरात काँग्रेस कमेटीच्या वतीने हुतात्म्यांना आदरांजली

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमेटीच्या वतीने रविवारी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारक वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे पुष्पचक्र वाहून आदरांजलीचा वाहण्यात आली.
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष चंदू नागरकर, माजी जिल्हा अध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हा अध्यक्ष सुभाषसिंह गौर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सचिव सुनीता लोढीया, चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, अ‍ॅड. विजय मोगरे, सेवादल अध्यक्ष प्रमोद राखुंडे, डॉ. विजय देवतळे, नंदा अल्लूरवार, विनोद संकत, केशव रामटेके उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहली.
याप्रसंगी अनिल शिंदे, बंडोपंत तातावार, वीरेंद्र लोढीया, सुरेश दुर्सेलवार, दीपक काटकोजवार, वंदना भागवत, अल्का रामटेके, अन्वर आली शाह, वाणी भूमतवार, श्याम राजूरकर, सागर वानखेडे, पितांबर कश्यप, निखिल धनवलकर, राजा काढी, सचिन चाहारे, वैभव बानकार, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रपूर जिल्हा (शहर )काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Congratulations to the martyrs of Chandrapur Congress Committee