ंगोंडपिंपरी बाजार समिती संचालकांचा सत्कार

By Admin | Updated: January 21, 2017 00:43 IST2017-01-21T00:43:53+5:302017-01-21T00:43:53+5:30

गोंडपिपरी बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली.

Congratulations to the director of Gondi Market Committee | ंगोंडपिंपरी बाजार समिती संचालकांचा सत्कार

ंगोंडपिंपरी बाजार समिती संचालकांचा सत्कार

गोंडपिपरी : गोंडपिपरी बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. १८ संचालक असलेल्या समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या तीन शिलेदारांनी विजयश्री कायम ठेवली. गोंडपिपरीत भाजपाचा वचनपुर्ती सोहळा पार पडला. या सोहळ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाकडून व्यापारी गटातून भारत झाडे, रितेश वेगीनवार, नरेंद्र पिदूरकर विजयी झाले. या तिनही संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Congratulations to the director of Gondi Market Committee