माजी मंत्री संजय देवतळे शोकसंवेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:21+5:302021-04-26T04:25:21+5:30
- प्रतिभा धानोरकर, आमदार, वरोरा -------- शांत, संयमी व सुस्वभावाचे धनी संजय देवतळे यांच्या मृत्यूची वार्ता कळली. राजकारणातील एक ...

माजी मंत्री संजय देवतळे शोकसंवेदना
- प्रतिभा धानोरकर, आमदार, वरोरा
--------
शांत, संयमी व सुस्वभावाचे धनी संजय देवतळे यांच्या मृत्यूची वार्ता कळली. राजकारणातील एक सरळमार्गी व्यक्तिमत्त्व हरपल्याचे दुःख वाटते. मंत्री पदावर असताना पदाचा कोणताही आविर्भाव त्यांच्या वागण्यात दिसत नव्हता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ॲड. वामनराव चटप, माजी आमदार, राजुरा.
-------
ज्येष्ठ नेते रामचंद्र उपाख्य दादासाहेब देवतळे यांचा वारसा नि:स्वार्थपणे सांभाळणारे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने वरोरा-भद्रावती मतदारसंघाची हानी झाली आहे. अतिशय शांत, संयमी लोकप्रतिनिधी कायमचा हरवला आहे. पक्षीय मतभेद विसरून कामे करणारा नेता आपल्याला सोडून गेल्याचे दुःख आहे.
- बाळू धानोरकर, खासदार
---------
अतिशय शांत स्वभावाने साऱ्यांनाच आपलेसे वाटणाऱ्या नेत्यास समाज मुकला. त्यांनी आपल्या शांत स्वभावाने कार्यकर्ते जोडत संघटन बळकट केले. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
--------
अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगणारे, विश्वासू व जिव्हाळ्याचे मित्र संजय देवतळे गेल्याने अतीव दुःख झाले. ही न भरून निघणारी हानी आहे. यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याने एका सच्चा नेत्याला गमावले आहे.
- हंसराज अहीर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री