घर गमावून बसलेल्या कुटुंबीयांचे भांगडियांकडून सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:49+5:302021-03-24T04:25:49+5:30
तळोधी बा. : काही दिवसांपूर्वी नागभीड तालुक्यातील नवेगाव (हुंडेश्वरी) येथील मंदा विनोद आदे व ललिता राजीराम लेनगुरे यांच्या घराला ...

घर गमावून बसलेल्या कुटुंबीयांचे भांगडियांकडून सांत्वन
तळोधी बा. : काही दिवसांपूर्वी नागभीड तालुक्यातील नवेगाव (हुंडेश्वरी) येथील मंदा विनोद आदे व ललिता राजीराम लेनगुरे यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील सर्व मूलभूत गरजू वस्तू व अन्न धान्य, किराणा जळून खाक झाले. या दोन्ही परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ही बाब माहिती हाेताच आमदार बंटी भांगडिया यांनी नवेगाव हुडेश्वरी येथील मंदा विनोद आदे व ललिता राजीराम लेनगुरे यांची भेट घेऊन जळलेल्या घरांची पाहणी केली. त्यांना मदतीचा हात दिला. तसेच लवकरात लवकर शासनाकडून नवीन घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. गावातील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी भाजपचे नागभीड तालुका अध्यक्ष संतोष रडके, नागभीड बाजार समिती सभापती आवेश पठाण, भाजपचे ज्येष्ठ नेते मदन अवघडे, शक्तिकेंद्र प्रमुख विनोद हजारे, बुथ अध्यक्ष अशोक पांडव, सरपंच कल्लुताई नेवारे, मंगल बुराडे, मोरेश्वर उईके, राजू सोनुले, कैलास सोनुले तसेच गावातील नागरिक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.