एफडीसीएममधील इमारतींची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:27+5:302020-12-31T04:28:27+5:30
चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे फॉरेस्ट डेव्हलपमेंट ऑफ काॅर्पोरेशनचा डेपो आहे. डेपोतील इमारती व तेथील अधिकाऱ्यांच्या ऑफिस अत्यंत दुरावस्थेत असल्यामुळे ...

एफडीसीएममधील इमारतींची दुरवस्था
चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे फॉरेस्ट डेव्हलपमेंट ऑफ काॅर्पोरेशनचा डेपो आहे. डेपोतील इमारती व तेथील अधिकाऱ्यांच्या ऑफिस अत्यंत दुरावस्थेत असल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना अत्यंत पडझड झालेल्या इमारतीमध्ये काम करावे लागत आहे.
महाराष्ट्र वानिकी प्रकल्पांतर्गत या निवासी इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. सन १९९८ मध्ये या निवासी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले.
परंतु खूप वर्षे इमारतीला झालेले असताना कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही. निवासी कर्मचाऱ्यांसाठी या इमारतीचे बांधकाम केले आहे. परंतु इमारती अत्यंत नादुरुस्त असल्यामुळे अधिकाऱ्यांना बाहेर राहावे लागत आहे.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भिंतीला रंगरंगोटी, विद्युत इत्यादी बाबीचा अभाव असलेले कर्मचारी निवासी इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
येथील डेपो हे पश्चिम चांदा वन प्रकल्प विभाग चंद्रपूर यांच्या अंतर्गत येते.