सराफा व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Updated: March 18, 2016 00:59 IST2016-03-18T00:59:10+5:302016-03-18T00:59:10+5:30

सोन्यावरील उत्पादन शुल्कात एक टक्का आणि अबकारी करात शासनाने वाढ केल्यामुळे गुरुवारी चंद्रपूर बंदचे आयोजन करण्यात आले.

Composite response to bullion traders | सराफा व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

सराफा व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : केंद्रीय वित्त मंत्र्यांना पाठविले निवेदन
चंद्रपूर : सोन्यावरील उत्पादन शुल्कात एक टक्का आणि अबकारी करात शासनाने वाढ केल्यामुळे गुरुवारी चंद्रपूर बंदचे आयोजन करण्यात आले. त्याला व्यापाऱ्यांनी समिश्र प्रतिसाद दिला. यावेळी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय वित्त मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. हा मोर्चा चंद्रपूर सराफा असोसिएशन, स्वर्णकार बचाव आंदोलन समिती व चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने काढण्यात आला.
शासनाने उत्पादन शुल्कवाढ व अबकारी करात वाढ केली. त्यामुळे संपुर्ण देशभरात सराफा व्यापाऱ्यांनी २ मार्चपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदला पंधरवड्यालाचा कालावधी उलटूनही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे गुरूवारी चंद्रपूर सराफा असोसिएशन तसेच चेंबर आॅफ कामर्सच्यावतीने गांधी चौकपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसेच चंद्रपूर सराफा असोसिएशन व चेंबर आॅफ कामर्सच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. मोर्चात चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, विनोद बजाज, रामकिशोर सारडा, राममिवान परमार, योगेश भंडारी तसेच चंद्रपूर सराफा असोशिएशन जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढा, शहर अध्यक्ष सत्यम यांच्यासह जिल्ह्यातील सराफा व्यापारी, सोनार व चेंबर आॅफ कॉमर्सचे सदस्य सहभागी झाले होते. ऐन लग्नसराईत सराफा व्यावसायिकांच्या बंदमुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. (नगर प्रतिनिधी)

सराफांच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांचा बल्लारपूर बंद
बल्लारपूर : देशभरातील सराफा (सोना-चांदीचे विक्रेते) व्यापाऱ्यांचा उत्पादन शुल्क वाढीच्या विरोधात गेलय १४ दिवसांपासून बेमुदत असलेल्या बंद आंदोलनाला समर्थन देण्यासाठी चेंबर्स आॅफ कॉमर्सने पुकारलेल्या एक दिवसीय बंदला गुरूवारी येथील सर्वच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. वस्ती भागातील लहान मोठी सर्वच दुकाने बंद राहिलीत. डेपो भागात चार पाच दुकाने वगळता येथील व्यापार ठप्प राहिला. बंदची पूर्व सूचना नसल्याने सामान्य नागरिकांना या बंदचा त्रास झाला.

Web Title: Composite response to bullion traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.