ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:37+5:302021-07-20T04:20:37+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य ...

ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण करा
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण आधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, बांधकामाच्या स्थितीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक तसेच अधिष्ठाता यांनी नियमित पाठपुरावा करावा, ऑक्सिजन प्लांटकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कामात विलंब व्हायला नको. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रुग्ण वाढण्याची शक्यता राहू शकते. त्यामुळे ऑगस्टअखेरपर्यंत सर्व पीएसए ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होणे आवश्यक आहे. पीएसए ऑक्सिजन प्लांटबाबत सूक्ष्म नियोजन करावे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी लसीकरणाचा आढावा घेतला.
कोविडची माहिती देताना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यात रोज दोन ते अडीच हजार चाचण्या होत असून, पॉझिटिव्हिटी दर एकपेक्षाखाली आहे. तसेच गत दहा दिवसांपासून जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे सांगितले.
बॉक्स
पालकमंत्र्यांकडून लष्करे कुटुंबाचे सांत्वन
दुर्गापूर येथे जनरेटरच्या वायुमुळे लष्करे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. यात कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याबाबत पालकमंत्र्यांनी तत्काळ माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर सोमवारी पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी लष्करे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व धीर दिला.