वैद्यकीय महाविद्यालयाचे काम वेगाने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:24 IST2018-10-15T23:24:19+5:302018-10-15T23:24:40+5:30
येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा, ते सर्वोत्तम होईल, याची काळजी घ्या, अशा सूचना राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत ना. मुनगंटीवार यांनी वरीच सूचना दिल्या.

वैद्यकीय महाविद्यालयाचे काम वेगाने पूर्ण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपर : येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा, ते सर्वोत्तम होईल, याची काळजी घ्या, अशा सूचना राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत ना. मुनगंटीवार यांनी वरीच सूचना दिल्या. यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला खा. विकास महात्मे, भारत सरकारची कंपनी एच.एस.सी. सी.चे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी करता यावी यासाठी खा. विकास महात्मे यांनी त्यांच्या खासदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी सुधारित ९७३ कोटी रुपयांच्या बांधकाम आराखड्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि रुग्णालयाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण विदर्भातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत.
नागरिकांची ही गरज ओळखून रुग्णालयाचे काम जलदगतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठीच भारत सरकारच्या एच.एस.सी.सी इंडिया लि. ची निवड करून त्यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले आहे. ते काम लवकरच पूर्ण करतील, असेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाने या कंपनीसमवेत सामंजस्य करार केला आहे, असेही ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.