डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; 2022 संपेपर्यंत झाले तरी मिळाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST2021-05-30T05:00:00+5:302021-05-30T05:00:19+5:30
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २०० पेक्षा जास्त केंद्र सज्ज आहेत. पण जिल्ह्याला पुरेसा लससाठा उपलब्ध मिळत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका आणि जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्र बंद ठेवाव्या लागत आहेत. आता दुसरा डोस घेणाºया ४५ वर्षांपुढील नागरिकांना डोस देणे सुरू आहे. परंतु लस घेणाºया प्राधान्य गटाच्या संख्येच्या तुलनेत डोस मिळत नाही. परिणामी चार दिवस लसीकरण सुरू ठेवल्यानंतर पाचव्या दिवशी केंद्र बंद करण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर येत आहे.

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; 2022 संपेपर्यंत झाले तरी मिळाले!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्गाविरूद्ध लढा देण्यासाठी खबरदारी पाळतानाच नागरिक आता लसीकरणाकडे लक्ष देत आहेत. परंतु पुरेसे डोस मिळत नाहीत. त्यामुळे लसीकरण करण्याची आरोग्य विभागाकडे व्यापक क्षमता असूनही केवळ डोसअभावी सुमारे ५० ते ७० केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. लसीकरणाचा वेग असाच मंद राहिला तर डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण होणे अवघडच असल्याचे सध्याचे चित्र आहे.
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २०० पेक्षा जास्त केंद्र सज्ज आहेत. पण जिल्ह्याला पुरेसा लससाठा उपलब्ध मिळत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगर पालिका आणि जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्र बंद ठेवाव्या लागत आहेत. आता दुसरा डोस घेणाºया ४५ वर्षांपुढील नागरिकांना डोस देणे सुरू आहे. परंतु लस घेणाºया प्राधान्य गटाच्या संख्येच्या तुलनेत डोस मिळत नाही. परिणामी चार दिवस लसीकरण सुरू ठेवल्यानंतर पाचव्या दिवशी केंद्र बंद करण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर येत आहे. बरेच आरोग्य कर्मचारी व प्रंटलाईन वर्करर्स अद्याप दुसरा डोस घेऊ शकले नाही. लस घेतल्याने कोरोना झाल्यानंतर प्रकृतीत समस्या निर्माण होत नाही, अशा बºयाच घटना उघडकीस आल्या. त्यामुळे लस घेण्यासाठी केंद्रासमोर नागरिक गर्दी करीत आहेत. पण डिसेंबरपर्यंत उद्दिष्ठ पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.
आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजता लसीकरणाला सुरूवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कुपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढ्या डोस आल्या तेवढेच कुपन आधी वितरण केले जाते. नागरिक कुपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही. त्यामुळे १०० लस उपलब्ध असताना २०० ते २५० नागरिक केवळ कुपनसाठी रांगेत लागतात. हा प्रकार टाळण्यासाठी आधी डोस किती याची माहिती देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
१८ वर्षांवरील १० हजार ८७ जणांनी घेतला डोस
- १ मे पासून १८ वर्षांवरील तरूणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. पण सुरूवातीला एकाही केंद्रावर १०० पेक्षा जास्त डोस उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे युवक- युवतींचा हिरमोड झाला.
- केंद्र सरकारने १८ वर्षे वयोगटातील लसीकरण लांबणीवर टाकले. जिल्ह्यात १८ वर्षांवरील १० हजार ८७ जणांनी पहिला डोस घेतला. आता या वयोगटाचे लसीकरण बंद आहे. डोस उपलब्ध नसताना केंद्र सरकारने घोषणा का केली, असा संतप्त सवाल युवक-युवती करीत आहेत.
- १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा तर केंद्र सरकारने अद्याप विचारच केला नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्याबाबत पालक काळजीत आहेत.
लसीकरणासाठी २५० केंद्र
लस देण्यासाठी जिल्ह्यात २५० पेक्षा जास्त केंद्र सज्ज आहेत. चंद्रपूर मनपा क्षेत्रातही नवीन केंद्र तयार करून ठेवले. सुरूवातील सर्व केंद्रांवर लसीकरण केल्या जात होते. मात्र, लशीचा तुटवडा सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे १०० केंद्रांवरूनच लस दिली जात आहे.