एसएमएसद्वारे नोंदविता येणार तक्रारी

By Admin | Updated: June 24, 2015 01:27 IST2015-06-24T01:27:58+5:302015-06-24T01:27:58+5:30

सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारी एसएमएसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे नोंदविता येणार आहे.

Complaint filed by SMS | एसएमएसद्वारे नोंदविता येणार तक्रारी

एसएमएसद्वारे नोंदविता येणार तक्रारी

चंद्रपूर : सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारी एसएमएसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे नोंदविता येणार आहे. त्याकरिता सॉफ्टवेअर प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामध्ये जनरल शाखा-सीओसी, जमीन शाखा- सीओसी१, खनिज शाखा-सीओसी२, नियोजन शाखा-सीओसी३, आस्थापना-सीओसी४, करमणूक-सीओसी५, संजय गांधी योजना- सीओसी६, निवडणूक शाखा- सीओसी७, सामान्य शाखा- सीओसी८, पुरवठा विभाग- सीओसी९, नगर प्रशासन शाखा- सीओसी१०, रोहयो शाखा- सीओसी११, सेतू शाखा- सीओसी१२ व अभिलेखागार शाखा- सीओसी१३ या शाखेसंबंधीच्या तक्रारी असल्यास एसएमएस टाईप करून ९९७०००१३१२ या क्रमांकावर पाठवावे. याकरिता ज्या शाखेसंबंधी तक्रार करायची असल्यास त्या शाखेचा कोड नंबर सीओसी (स्पेस) टाकून सविस्तर तक्रार, नाव व पत्ता दर्शवून तक्रार पाठविण्याची सुविधा आहे. नागरिकांनी एसएमएसद्वारे तक्रारी नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Complaint filed by SMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.