मनपाच्या भोंगळ कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
By Admin | Updated: August 3, 2016 01:55 IST2016-08-03T01:55:59+5:302016-08-03T01:55:59+5:30
जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर व माजी प्रदेश सचिव सुनीता लोढीया, वंदना भागवत, हरिदास लांडे, ...

मनपाच्या भोंगळ कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
चंद्रपूर : जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर व माजी प्रदेश सचिव सुनीता लोढीया, वंदना भागवत, हरिदास लांडे, राजू दास, निखिल धनवलकर यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची १ आॅगस्ट रोजी भेट घेवून चंद्रपूर शहरातील समस्या व महानगरपालिकेतील गलथान कारभाराबाबत चर्चा केली.
यामध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद बगीचाच्या सौंदर्यीकरण निविदा प्रथम लोएस्ट न देता तिसऱ्या हायस्टला देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या अनेक निविदामध्ये घोळ झाला आहे. चंद्रपूर शहरातील अवैध बांधकाम, शासकीय अनुदानातून चंद्रपूर महानगरपालिकेला मिळण्याऱ्या निधीतून महानगर पालिकेतील सर्व नगरसेवकाला विकासाकरिता समान निधी मिळण्याबाबत व महापौर, उपमहापौर, सभापती यांना असा स्वतंत्र अधिकार देवू शकत नाही.
सर्व प्रभागातील नगरसेवकांना समान निधी वाटप करायला पाहिजे अशी मागणी यावेळी केली. (स्थानिक प्रतिनिधिी)