वैद्यकीय अहवालापूर्वीच सीआरपीएफ जवान फिरत असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:01:11+5:30

राज्य राखीव दलाचे जवान काही दिवसांपूर्वी पुणे येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चार जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे काही जवानांचे विलिगीकरण करण्यात आले. मात्र, स्वॅब घेतल्यानंतर अद्याप अहवाल यायचा असताना केंद्र राखीव दलाचे जवान माजरी शहरात फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

Complaint that CRPF jawans were moving before the medical report | वैद्यकीय अहवालापूर्वीच सीआरपीएफ जवान फिरत असल्याची तक्रार

वैद्यकीय अहवालापूर्वीच सीआरपीएफ जवान फिरत असल्याची तक्रार

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली भीती व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : जिल्ह्यात बंदोबस्ताकरिता कोल्हापूर येथून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची एक तुकडी येथील नवीन पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वसाहतीत होम क्वारंटाईनमध्ये आहे. यातील सर्व ९० जवानांचे स्कॅब तपासणीला पाठविण्यात आले. अद्याप अहवाल आला नाही. मात्र, काही जवान चहा व नाश्तासाठी शहरातील हॉटेलमध्ये फिरत असल्याची तक्रार पोलिसात करून कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
राज्य राखीव दलाचे जवान काही दिवसांपूर्वी पुणे येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चार जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे काही जवानांचे विलिगीकरण करण्यात आले. मात्र, स्वॅब घेतल्यानंतर अद्याप अहवाल यायचा असताना केंद्र राखीव दलाचे जवान माजरी शहरात फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. माजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माजरी ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, माजरीच्या नवीन पोलीस स्टेशनच्या कर्मचारी आवासमध्ये संस्थात्मक विलिगीकरणाची माहिती ग्रामपंचायतीला देण्यात आली नाही, असे पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.

नवीन पोलीस ठाणे कर्मचारी वसाहतीत जवानांना संस्थात्मक विलिगीकरणात ठेवल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली नाही. संस्थात्मक विलिगीकरणामधील काही बाहेर फिरत असल्याची तक्रार माजरी पोलीस ठाण्यात केली आहे.
- डॉ. रिजवान परवीन, वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र्र, माजरी
बटालियनमधील कुणीही जवान बाहेर फिरत नाही. याबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. तुकडीतील सर्व जवानांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आहे.
-एन. एम. बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भारतीय राखीव बटालियन
केंद्रीय राखीव बटालियनला संस्थात्मक विलिगीकरणात करण्यात आले. जि.प.सदस्य प्रवीण सूर यांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. त्या जवानांना बाहेर फिरू नये, याकरिता पोलिसांना आदेशित करतो.
- महेश शितोडे, तहसीलदार, भद्रावती
केंद्रीय राखीव दलातील जवान संस्थात्मक विलगीकरणात नाही. त्यांची केवळ राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- सदाशिव ढाकणे, ठाणेदार माजरी
कोल्हापूर येथून आलेली ही तुकडी बंदोबस्तासाठी आलेली आहे. कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी या जवानांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
- निलेश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा
 

Web Title: Complaint that CRPF jawans were moving before the medical report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.