ब्रह्मपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा

By Admin | Updated: February 23, 2017 00:42 IST2017-02-23T00:42:11+5:302017-02-23T00:42:11+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त दी बुद्धीस्ट एम्प्लाईज अ‍ॅन्ड नॉन एम्प्लाईज सोशल असोसिएशन ब्रह्मपुरीच्या वतीने...

Competitive examination guidance meeting at Brahmapuri | ब्रह्मपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा

ब्रह्मपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा

अभिनव उपक्रम : दी बुद्धीस्ट एम्प्लॉईज सोशल असोसिएशनचे आयोजन, गुणवंताचा सत्कार
ब्रह्मपुरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त दी बुद्धीस्ट एम्प्लाईज अ‍ॅन्ड नॉन एम्प्लाईज सोशल असोसिएशन ब्रह्मपुरीच्या वतीने एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा, २१ तास अखंड वाचन, बक्षीस वितरण व आदर्श शिक्षकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी हे होते. अध्यक्ष म्हणून सहायक गटविकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी पं.स. ब्रह्मपुरीचे डॉ.चेतन जाधव व प्रमुख मार्गदर्शक उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे हे होते. मंचावर संघटनेचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष परमानंद नंदेश्वर, उपाध्यक्ष देवानंद मेश्राम, सचिव पद्माकर रामटेके, शांताराम भैसारे, गौतम जनबंधू तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रभू वैद्य, अनिल वाळके, भीमराव ठवरे आणि रतिराम चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास इत्यादी गुण विद्यार्थ्यांनी अंगी बानावेत. गटागटातून अभ्यास करावा. प्रथम ध्येय निश्चित करावे. नंतरच स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला लागावे, सर्वच क्षेत्राचा तौलनिक व सखोल अभ्यास करावा असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, यांनी व्यक्त केले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ.चेतन जाधव तसेच उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण व्हावे. असा आशावाद संघटनेचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष परमानंद नंदेश्वर यांनी प्रास्ताविकातून केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच २१ तास अखंड वाचन स्पर्धेत १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व धम्मज्ञान परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या नऊ विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, हे पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पद्माकर रामटेके, देवानंद मेश्राम, वैकुंठ टेंभुर्णे, प्रिती मेश्राम, प्रदीप मेश्राम, अ‍ॅड. अर्चना कांबळे, अनिल हुमने, नितीन बोदेले, मदन शेंडे, अरविंद वानखेडे, महेंद्र साखरे, रितेश वाघमारे, सचिन खोब्रागडे, मनोरंजन धोंगडे, नितीन खोब्रागडे, अजय कऱ्हाडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन सतीश डांगे, पद्माकर रामटेके, वैकुंठ टेंभुर्णे यांनी तर आभार प्रिती मेश्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

इन्सपायर अ‍ॅकडमीतर्फे मार्गदर्शन शिबीर
ब्रह्मपुरी : इन्स्पायर करिअर अकॅडमी फाशी चौक ब्रह्मपुरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.आकाश मेश्राम, प्रा. बालाजी दमकोंडवार व गितेश केशवे, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी प्रा. आकाश मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या मार्गाने प्रशस्त व्हावे असा सल्ला दिला. प्रा. दमकोंडवार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करून जीवनात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्पायर करिअर अकॅडमीचे संचालक प्रा.लक्ष्मण मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अवि चहारे यांनी तर आभार प्रा. अभय तलमले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल येने, सुरज मेश्राम, संदीप घ्यार, अतुल चहारे, सचिन जरूरकर, अमोल चव्हान आदींनी सहकार्य केले.

Web Title: Competitive examination guidance meeting at Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.