शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरिता समिती

By Admin | Updated: March 27, 2016 00:34 IST2016-03-27T00:34:38+5:302016-03-27T00:34:38+5:30

त्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण या ऐतिहासिक नगरीत सुमारे तीन दशकानंतरसुद्धा उभारू शकलो नाही.

Committee to build Shiva's statue of Shivaji Maharaj | शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरिता समिती

शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरिता समिती

सुधीर मुनगंटीवार : शिवसेनेच्या शिवमहोत्सवात घोषणा
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण या ऐतिहासिक नगरीत सुमारे तीन दशकानंतरसुद्धा उभारू शकलो नाही. चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याकरिता तात्काळ समिती गठित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवमहोत्सवाचे येथील गांधी चौकात शुक्रवारी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवमहोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार बाळू धानोरकर यांच्यासह व्यासपिठावर महापौर राखी कंचर्लावार, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतिश भिवगडे, उपजिल्हा प्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार, माजी उपमहापौर संदीप आवारी, माजी जिल्हा प्रमुख दीपक दापके, दिलीप कपूर, युवा सेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारती दुधाणी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख माया पटले, शहर प्रमुख सुरेश पचारे, महिला आघाडी शहर प्रमुख सायली येरणे, नगरसेवक आकाश साखरकर, नगरसेविका योगिता मडावी, तालुका प्रमुख शालिक फाले आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी केले. संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनीही शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
शिवसेनेने यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेत तीन दिवसीय शिवमहोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त शिवसेनेने विविध उपक्रम घेतले. शिवजयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी चंद्रपुरात विविध देखाव्यांसह शोभायात्रेचे आयोजनही करण्यात आले होते. दोन दिवसांपासून ध्वनीक्षेपकावरून शहरात वाजत असलेल्या पोवाड्यांमुळे आणि शिवचरित्राच्या गितामुळे शहरातील वातावरण शिवमय झालेले दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Committee to build Shiva's statue of Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.