आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध

By Admin | Updated: August 12, 2015 00:47 IST2015-08-12T00:47:38+5:302015-08-12T00:47:38+5:30

आदिवासी समाजाच्या पाठीशी आपण सदैव असून समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहो.

Committed to the development of tribal communities | आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध

आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध

बाळू धानोरकर : आदिवासी दिन कार्यक्रम
वरोरा : आदिवासी समाजाच्या पाठीशी आपण सदैव असून समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहो. आदिवासी संस्कृती भवन व वीर बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळू धानोरकर यांनी केले. वरोरा येथील भारत भूषण मालविय विद्यालयातील सभागृहात शनिवारी आयोजित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे, नगरसेविका दर्शना मडावी, नगरसेविका अंजू आडे, नगरसेविका दर्शना सोयाम, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, प्रा. अविनाश पंधरे, प्रा. उमेश मेश्राम, प्रा. नीरज आत्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वीर बिरसा मुंडा व वीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, प्रा. अविनाश पंधरे आदी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल कुमरे यांनी तर आभार हरी कुळसंगे यांनी मानले. कार्यक्रमाला समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Committed to the development of tribal communities