ओबीसी जनगणनेसाठी पाटी लावा मोहीम राबविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:18+5:302021-01-08T05:35:18+5:30

नागभीड : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ओबीसी समाजाच्या झालेल्या सभेत प्रत्येक घरावर ओबीसी जनगणना पाटी ...

Commitment to implement Pati Lava campaign for OBC census | ओबीसी जनगणनेसाठी पाटी लावा मोहीम राबविण्याचा संकल्प

ओबीसी जनगणनेसाठी पाटी लावा मोहीम राबविण्याचा संकल्प

नागभीड : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ओबीसी समाजाच्या झालेल्या सभेत प्रत्येक घरावर ओबीसी जनगणना पाटी लावण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी ओबीसी जनगणना पाटी लावा मोहिमेवर व्यापक चर्चा केली.

सरकार जोपर्यंत जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम समाविष्ट करीत नाही, तोपर्यंत जनगणनेमध्ये सहभागी व्हायचे नाही, असे बैठकीत ठरविण्यात आले. यासाठी नागभीड तालुक्यातील प्रत्येक गावात पाटी लावा मोहीम अधिक तीव्र गतीने कशी करता येईल, यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी मधू डोईजड, पुरुषोत्तम बगमारे, प्रा. डॉ. हरिदास वाकुडकर, डॅनियल देशमुख, हरीश मुळे, गिरीश नगरे, लाखे, मोरांडे, अमोल वानखेडे, चंदनबावणे, सुनील पाथोडे, गुरुदेव पिसे, स्वप्निल नवघडे, पराग भानारकर, उषा राऊत, सचिन कठाणे, सूरज भेंडारकर, अल्का बगमारे, चेतन भोयर, मेहेर, कुंदा देशमुख, विनायक चिलबुले, आदींची उपस्थिती होती. श्रीकांत राऊत यांनी संचालन केले. स्वप्निल नवघडे यांनी आभार मानले.

Web Title: Commitment to implement Pati Lava campaign for OBC census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.