‘त्या’ दिवशी एकटाच आल्याने झाला घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:27+5:302021-02-05T07:33:27+5:30
राजू यादव व चंदन सिंग हे दोघेही मूळचे बिहार राज्यातील. अनेक वर्षांपासून हे दोघेही येथे वास्तव्यास आले. खाणीतून ...

‘त्या’ दिवशी एकटाच आल्याने झाला घात
राजू यादव व चंदन सिंग हे दोघेही मूळचे बिहार राज्यातील. अनेक वर्षांपासून हे दोघेही येथे वास्तव्यास आले. खाणीतून ट्रकद्वारे कोळशाचा व्यवसाय करायचे. अशातच ट्रान्सपोर्ट युनियनची स्थापना करण्यात आली. राजू यादवला युनियन अध्यक्ष करण्यासाठी चंदन सिंग व त्यांच्या नातेवाईकांनी मदत केली होती. परंतु काही दिवसांनी दोन मित्रांमध्ये कोळसा खाणीत कोळशाची उचल करण्यासाठी ट्रक लावण्यावरून वाद होऊ लागले. चंदन सिंग आणि सतेंद्रकुमार सिंग हे गाडी मालक होते. हा वाद विकोपाला गेला. यातूनच राजू यादवच्या हत्येचा कट शिजला. घटनेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता राजू यादव एकटाच आपल्या लाल रंगाच्या गाडीने राजुऱ्याला आला. हे हेरून त्याच्या शत्रू झालेल्या मित्रांनी डाव साधत राजू यादवचा काटा काढला. या घटनेची चाैकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे, प्रशांत साखरे, चेतन टेंभूर्णे, संपत पुलिपाका, श्रीकांत चन्ने करीत आहेत.