कलर्स प्रस्तुत सखी मंचतर्फे ‘ तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा
By Admin | Updated: December 22, 2016 01:47 IST2016-12-22T01:47:50+5:302016-12-22T01:47:50+5:30
आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली पसंत- नापसंत याकडे दुर्लक्ष करतात.

कलर्स प्रस्तुत सखी मंचतर्फे ‘ तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा
आई-मुलींचे सादरीकरण : आई-मुलींच्या भावविश्वावर आधारित कार्यक्रम
चंद्रपूर : आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली पसंत- नापसंत याकडे दुर्लक्ष करतात. ते मुलांच्या करिअर आणि भविष्याचा मुख्य आधार असतात. यात आईची भूमिका अतिशय संवेदनशील ठरते. कर्तव्य आणि प्रेमाचा संगम आईमध्ये पाहावयास मिळतो. याच विषयावर लोकमत सखी मंच आणि कलर्सतर्फे तू माझा स्वाभिमान या कार्यक्रमाचे आयोजन येथील आयएमए सभागृहात गंजवार्ड चंद्रपूर येथे करण्यात आले. यात आई आणि मुलींच्या मैत्रीपूर्ण भावनात्मक नात्यावर आधारीत आम्ही दोघी माय- लेकी’ ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेच्या चार राऊंडमध्ये आई-मुलींच्या जोड्यांनी व्यासपीठावर प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेच्या पहिल्या रांऊडमध्ये आई आणि मुलींच्या जोडीने कविता, शेरी शायरीच्या अंदाजात एकमेकांची ओळख करुन दिली. दुसऱ्या राऊंडमध्ये आई-मुलीने गायन, नृत्य, रांगोळी, पाककृती, अभिनय आदी सादर केले. तिसरा राऊंड ‘सिच्युएशन राऊंड’ होता. यात परिक्षकांनी एकेका जोडीसमोर परिस्थिती निर्माण करुन त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले.एका आई- मुलींच्या जोडीला विचारण्यात आले की, जर मुलीसाठी खूप श्रीमंत स्थळ आले आणि त्यांनी लग्नानंतर मुलीला नोकरी करण्यास मनाई केली तर काय करणार? जर कोणी आईचा अपमान केला तर काय कराल? या पद्धतीने विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रश्नांचा सामना स्पर्धकांनी केला. चौथा राऊंड प्रश्नोत्तराचा होता. यात परीक्षकांनी आई आणि मुलीला त्यांच्या ऐकमेकींच्या आवडी- निवडीवर प्रश्न विचारले.
स्पर्धेचे परिक्षण अॅड. संध्या मुसळे आणि सागर अदनकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून संगीनी क्लब आॅफ आयएमएच्या अध्यक्षा डॉ. विद्या बांगडे व सचिव डॉ. सिद्धीका शिवजी, लोकमतचे सहा. शाखा व्यवस्थापक विनोद बुले, यांना आमंत्रीत करण्यात आले. स्पर्धेत शहरातील १६ आई-मुलींच्या जोड्यांची निवड आॅडीशनच्या माध्यमातून करण्यात आली. संचालन पूजा ठाकरे यांनी केले. नेहमीच कौटुंबिक विषयांना घेऊन येणाऱ्या कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. २२ कलर्सवर १९ डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता आई- मुलींच्या मजबूत नात्यावर ‘एक शृंगार... स्वाभिमान’ या मालिकेचे प्रसारण होत आहे. यात गणिताची शिक्षिका शारदा हिने आपल्या दोन मुलींना आधुनिक विचारांसोबतच स्वाभिमानाने आणि शिकविले. मुलींना कर्मठ करण्यासाठी आधी नोकरी आणि नंतर लग्न करण्याची भूमिका घेऊन शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. नौकरी करण्याचा उद्देश केवळ पैसे मिळविणे नसून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग आहे.
घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीच्या द्वारे करिअरला अधिक महत्व देणारी स्त्री आदर्श का नाही? असा प्रश्न शारदा समाजासमोर ठेवते. तिच्या सर्व प्रश्नाची उत्तरे काय आहेत हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. ‘आम्ही दोघी मायलेकी’ मध्ये एक दुसऱ्याना समजून घेणाऱ्या आई मुलींच्या जोड्यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमात प्रियंका वरघने यांनी लावणी व नृत्य सादर केले. उपस्थित सखीनी एक मिनिट गेम शोचा आनंद घेतला. (नगर प्रतिनिधी)