एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला
By Admin | Updated: December 19, 2015 00:46 IST2015-12-19T00:46:17+5:302015-12-19T00:46:17+5:30
शुक्रवारी दुपारनंतर परिवहन मंत्र्यांशी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सायंकाळी ४ वाजतानंतर एसटीच्या संपकरी कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला
प्रवाशांना दिलासा : लोकवाहिनीच्या चाकांना आली गती
चंद्रपूर: शुक्रवारी दुपारनंतर परिवहन मंत्र्यांशी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सायंकाळी ४ वाजतानंतर एसटीच्या संपकरी कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर आगारातून बसेस धावू लागल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
२५ टक्के वेतनवाढीच्या मागणीसाठी गुरूवारी सकाळपासून एसटी कामगार संपावर उतरले. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी बस वाहतूक ठप्प झाली. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत. आंदोलनाची तिव्रता लक्षात घेता, परिवहन मंत्र्यांनी तातडीने संपकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली. त्यात मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. (प्रतिनिधी)