पोवनी ओपनकास्टमध्ये कोल स्टॉकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:23+5:302021-03-23T04:30:23+5:30
वेकोलि प्रशासनाचे दुर्लक्ष : वेकोलिला लाखोंचा चुना गोवरी : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी कोळसा खाणींच्या कोल स्टॉकला आग लागल्याने ...

पोवनी ओपनकास्टमध्ये कोल स्टॉकला आग
वेकोलि प्रशासनाचे दुर्लक्ष : वेकोलिला लाखोंचा चुना
गोवरी : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी कोळसा खाणींच्या कोल स्टॉकला आग लागल्याने या आगीत लाखों रुपयांचा कोळसा धगधगत आहे. यात वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. परंतु वेकोलि प्रशासन याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील पोवनी खुल्या कोळसा खाणीतील करोडो रुपयांच्या कोल स्टॉकला आग लागल्याने लाखो रुपयांचा कोळसा जळून खाक होत आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे वेकोलिला कोळसा जळत असल्याने चांगलाच फटका बसला आहे. महागड्या कोळशाला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. मात्र कोळसा खाणीत सुरक्षेचा अभाव असल्याने व वेकोलीच्या ढिसाळ नियोजनामुळे वारंवार कोळशाच्या स्टॉकला आग लागण्याच्या घटना घडत आहे. उन्हामुळे वारंवार कोळसा पेट घेत असताना वेकोलीने वेळीच उपायोजना करणे गरजेचे आहे. पोवनी कोळसा खाण व्यवस्थापनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वेकोलीला कोळसा जळत असल्याने लाखो रुपयांचा चुना लागत आहे. या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर लाखो रुपयांचा कोळसा सुरक्षित ठेण्यासाठी वेकोलि अधिकाऱ्यांना कोळसा खाणीत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
बॉक्स
कोळसा खाणीतील धुळीने कामगारही बेजार
पोवनी कोळसा खाणीत नियोजनाचा अभाव आहे. या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धुळीमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात असताना यावर वेकोलिने अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. त्यामुळे कोळशाच्या धुळीने कामगारांचा जीव गुदमरतो आहे. वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमविणाऱ्या वेकोलि प्रशासनाने कामगारांच्या जीवाची काळजी का घेऊ नये, या प्रश्नाचे उत्तर अजूनही वेकोलि प्रशासनाला देता आले नाही. हे खाणीत काम करणाऱ्या कामगारांचे दुर्दैव आहे.