राजुरा-गडचांदूर राज्य मार्गावर कोळशाचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:21+5:302021-07-20T04:20:21+5:30
पोलिसांचे दुर्लक्ष : खुल्या बाजारात जादा दराने विक्री बी.यू. बोर्डेवार राजुरा : अत्यंत वर्दळीच्या राजुरा ते गडचांदूर राज्य मार्गावर ...

राजुरा-गडचांदूर राज्य मार्गावर कोळशाचा साठा
पोलिसांचे दुर्लक्ष : खुल्या बाजारात जादा दराने विक्री
बी.यू. बोर्डेवार
राजुरा : अत्यंत वर्दळीच्या राजुरा ते गडचांदूर राज्य मार्गावर कोळशाचे अवैध स्टॉक असून या मार्गावरून पोलीस अधिकाऱ्यांची ये-जा असतानासुद्धा त्यांना हा प्रकार दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, रस्त्याच्या कडेला ट्रॅक उभे करून कोळसा उतरविण्यासाठी येत असल्याने हा गंभीर प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सास्ती परिसरात बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत कोळशाच्या अनेक खाणी आहे. यातील काही खाणीतून उच्च दर्जाचा कोळसा काढण्यात येतो. या कोळशाची गडचांदूर मार्गाने सिमेंट कारखान्यात वाहतूक केली जाते आणि याच ट्रकमधून कोळसा उतरविला जातो. सध्या या वर्दळीच्या राज्य मार्गावर असलेल्या कापणगावपासून ते हरदोना गावापर्यंतच्या मार्गात अनेक कोळशाचे स्टॉक पाहायला मिळत आहे. त्यानंतर स्टॉकवर जमा झालेला कोळसा खुल्या बाजारात वाढीव किमतीत विकल्या जात आहे. आजघडीला बहुतेक स्टॉकवर मोठ्या प्रमाणात कोळसा जमा होत असल्याची माहिती आहे. याच मार्गावरच्या हरदोना गावलागतच्या शेतात कोळशाचा मोठा स्टॉक असल्याचे दिसून येत आहे.
190721\img-20210715-wa0266.jpg
स्टॉक फोटो