कोळशाची भुुकटी वर्धा नदीच्या पात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:46+5:302020-12-04T04:56:46+5:30
नदी प्रदूषित : ताडपत्री न बांधता होते वाहतूक घुग्घुस : वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीतून घुग्घुस कोळसा सायडिंगमधून ...

कोळशाची भुुकटी वर्धा नदीच्या पात्रात
नदी प्रदूषित : ताडपत्री न बांधता होते वाहतूक
घुग्घुस : वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीतून घुग्घुस कोळसा सायडिंगमधून ट्रकद्वारे विना टाळपत्रीविना कोळसा वाहतूक केली जाते. मुंगोली पुलाच्या दोन्ही बाजूनी कोळशाच्या चुरीचा थर बसला आहे. वाहतुकीमुळे वाहनांच्या वर्दळीने उडत आहे. रस्त्यावरून समोरील वाहन दिसत नाही. पुलावरील स्वच्छता कंत्राटदाराकडून होत नसल्याने कोळशाची भुकटी नदी पात्रात जात असल्याचे दिसून येत आहे.
वेकोलिला सर्वात जास्त कोळसा उत्पादन देरणारी कोळसा खाण म्हणून वणी क्षेत्रातील पैनगंगा खुली व मुंगोली कोळसा खाणीची ओळख आहे. या खाणीतून हॅन्डलिंक प्लॉन्ट व घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक होते. कमी वेळेत जास्त कोळसा वाहतूक करण्याच्या नादात ट्रकवर टाळपत्री बांधली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर कोळसा पडतो. त्यावरून वाहने धावत असल्याने कोळशाची भुकटी तयार नदी पात्रात जात आहे. कोळसा वाहतुकीमुळे नदी पात्र स्वच्छ करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
बॉक्स
टारपोलीनच्या नावावर फाटके पोते
कंत्राटी मजुरांकडून या रस्त्याची स्वच्छता केल्यानंतर मुंगोली पुलाच्या दोन्ही बाजुने चुरी नदी पात्रात फेकण्याचे प्रकार सुरू आहेत. वाहतुकदारांकडून टारपोलीन म्हणून सिमेंटचे पोते टाकले जाते. तेही फाटके असते. योग्यरित्या बांधल्या जात नाही. या रस्त्यावरून दररोज शेकडो ट्रक कोळसा वाहतूक करतात.