माजरी : राष्ट्रीय कोळसा क्षेत्रात कार्यरत पाच ट्रेड युनियनचे देशव्यापी संमेलन नागपूर येथे पार पडले. यात इंटक, बीएमएस, आयटक, एचएमएस व सिटू या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोळसा कामगारांच्या ५५ मागण्यांचे संयुक्त निवेदन कोळसा सचिवकडे पाठविण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. केंद्र सरकार व कोल इंडिया प्रबंधन यांनी कामगारांच्या मागण्या मान्य करुन त्वरीत अंमलात आणावे, अन्यथा येणाऱ्या काळात देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत २१ सप्टेंबर पर्यंत निर्णय व्हावा, असे संघटनेने म्हटले आहे. या संयुक्त संमेलनास इंटक अध्यक्ष राजेंद्र प्रसाद सिंह, भारतीय मजदूर संघाचे सुरेंद्र कुमार, आयटकचे आर.सी. सिंह, हिंदू मजदूर संघाचे नाथुलाल पांडे, जिवन राय, एस.क्यू. जामा, उमाशंकर सिंह, नरेंद्रचंद्रय्या, एच. एस. बेग यांनी संबोधीत केले. ५५ मागण्यांच्या निवेदनात, राष्ट्रीय संपत्ती कोळसा क्षेत्र नियमबाह्य खाजगी मालकांना दिले गेले. ते खाणपट्टे परत घ्यावे. पाचही ट्रेड युनियन सोबत चर्चा करुन कोल इंडियाचे पूनर्रचना व्हावे, राष्ट्रीय कोळसा उद्योगास बजेट माध्यमातून सहकार्य मिळावे, कोळशाची किंमत ठरवितांना बैठकीत कामगार संघटणांना सामिल करावे, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच राष्ट्रीय कोयला वेतन समझोता खाजगी कोळसा कंपनींना बंधनकारक करावा, महिला कामगारांसाठी स्वेच्छीक सेवानिवृत्ती योजना त्वरीत लागू करावी, खाणीत अपघात होवून घटनास्थळी मृत पावलेल्या नातेवाईकांना पाच लाख रुपये दिले जाते. हा नियम ठेका मजदूर यांनाही लागू करावे, खाणीसाठी जमीन हस्तांतरण संदर्भात जमीन मालकांना आर. आर. पॉलीसी अंतर्गत दर द्यावा या मागण्या आहेत. (वार्ताहर)
कोळसा कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा
By admin | Updated: September 18, 2014 23:33 IST